बार्सिलोना - दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनासोबत प्रशिक्षणाला सुरूवात केली आहे. यापूर्वी, मेस्सीने बार्सिलोनाला अलविदा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे तो संघाच्या प्रशिक्षण सत्रात सामील झाला नव्हता.
-
Leo Messi returns to Barca training for the first time since asking to leave the club 📸 pic.twitter.com/oqxdBr0rJ2
— B/R Football (@brfootball) September 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Leo Messi returns to Barca training for the first time since asking to leave the club 📸 pic.twitter.com/oqxdBr0rJ2
— B/R Football (@brfootball) September 7, 2020Leo Messi returns to Barca training for the first time since asking to leave the club 📸 pic.twitter.com/oqxdBr0rJ2
— B/R Football (@brfootball) September 7, 2020
एका वृत्तानुसार, २० ऑगस्ट रोजी क्लबच्या प्रशिक्षणापूर्वी मेस्सीची पीसीआर चाचणीदेखील झाली नव्हती. शिवाय, त्याने क्लबचे नवीन प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांच्याबरोबर प्रशिक्षणही घेतले नव्हते. संघाच्या कामगिरीमुळे मेस्सीला संघाला रामराम ठोकण्याची इच्छा होती.
-
Leo #Messi begins preseason training. pic.twitter.com/ygPNpWzjkb
— FC Barcelona (@FCBarcelona) September 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Leo #Messi begins preseason training. pic.twitter.com/ygPNpWzjkb
— FC Barcelona (@FCBarcelona) September 7, 2020Leo #Messi begins preseason training. pic.twitter.com/ygPNpWzjkb
— FC Barcelona (@FCBarcelona) September 7, 2020
मात्र, बार्सिलोनाला मेस्सी २०२१ हंगाम संपेपर्यंत संघासोबत कायम हवा आहे. मेस्सीशी केलेल्या करारानुसार, जर त्याने आता मध्येच क्लब सोडला असता तर त्याला ७० कोटी युरो रक्कम कराराचा भंग म्हणून भरावी लागली असती. त्यामुळे ३३ वर्षीय मेस्सीने बार्सिलोना क्लब यंदाच्या हंगामात न सोडण्याचा निर्णय घेतला.
मेस्सीने ४ सप्टेंबरला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याने २०२०-२१ हंगामापर्यंत बार्सिलोनामध्येच राहणार असल्याचे सांगितले आहे.