ETV Bharat / sports

स्पेनच्या मोठ्या फुटबॉल लीगला सरकारकडून हिरवा कंदील

author img

By

Published : May 25, 2020, 12:04 PM IST

"स्पॅनिश सरकारने आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून 8 जूनपासून लीग पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे", असे लीगने ट्विटरवर म्हटले.

La Liga football league resume from June 8
स्पेनच्या मोठ्या फुटबॉल लीगला सरकारकडून हिरवा कंदील

माद्रिद - स्पॅनिश लीग ला-लीगा पुढील महिन्यात 8 जूनपासून सुरू होईल. ट्विटरद्वारे लीगने याविषयी माहिती दिली. लीग पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकृत तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु ही लीग 12 जूनपासून सुरू होऊ शकेल, असे लीगचे अध्यक्ष झेवियर तेबास म्हणाले आहेत.

"स्पॅनिश सरकारने आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून 8 जूनपासून लीग पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे", असे लीगने ट्विटरवर म्हटले.

या वृत्तावर प्रतिक्रिया देताना तेबास म्हणाले, "आम्ही या निर्णयामुळे खूप खूश आहोत. क्लब, खेळाडू, तांत्रिक अधिकारी आणि राष्ट्रीय क्रीडा परिषदेसाठी ही चांगली बातमी आहे. परंतु हा साथीचा रोग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करणे आवश्यक आहे."

स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सांचेस यांनीही लीग सुरू करण्यास पाठिंबा दर्शवला आहे. "स्पेनने जे करायला हवे होते ते केले. आता उपक्रम सुरू करण्याची वेळ आली आहे", असे सांचेस म्हणाले आहेत. या लीगमधील संघांनी 18 मेपासून प्रशिक्षण सुरू केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.