नवी दिल्ली - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू पाउलो डायबालाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारातून तो कोरोनातून मुक्त झाला. डायबालाने उपचारादरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. ‘मी व्यथित झालो होतो. प्रत्येक ५ मिनिटाला श्वास कोंडायचा आणि स्नायू ताणले जात होते’, असे डायबालाने आपला अनुभव सांगत म्हटले आहे.
‘धोकादायक संसर्गानंतर मला आता बरे वाटू लागले आहे. हे दिवस माझ्यासाठी वाईट स्वप्नांसारखे होते. प्रत्येक ५ मिनिटाला श्वास कोंडायचा . खूप थकवा असायचा. शरीरावरही भारीपणा जाणवू लागला आणि स्नायू कठोर होऊ लागले होते’, असे डायबालाने म्हटले आहे.
अर्जेंटिनामध्ये ९००० लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. डायबालासोबत जुवेंटसच्या रूगाणी आणि ब्लेज मतुदीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते आता बरे झाले आहेत.