नवी दिल्ली - कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या व्हायरसचा संचार क्रीडाविश्वातही झाला असून अनेक खेळाडूंना याची लागण झाली आहे. दरम्यान, या व्हायरसमुळे इराकच्या दिग्गज माजी फुटबॉलपटूला आपला जीव गमवावा लागला.
21 एप्रिल 1964 रोजी बगदादमध्ये जन्मलेल्या इराकचे दिग्गज फुटबॉलपटू अहमद राधी यांचे रविवारी निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. इराकच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांना कोरोनो व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त दिले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली.
-
#Iraq Mourns #Football Legend #AhmedRadhi https://t.co/1esShPv9K4
— Asharq Al-Awsat English (@aawsat_eng) June 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Iraq Mourns #Football Legend #AhmedRadhi https://t.co/1esShPv9K4
— Asharq Al-Awsat English (@aawsat_eng) June 22, 2020#Iraq Mourns #Football Legend #AhmedRadhi https://t.co/1esShPv9K4
— Asharq Al-Awsat English (@aawsat_eng) June 22, 2020
गुरुवारी त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर राधी यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, राधींची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी पहाटे मोठ्या संख्येने लोक इराकच्या राजधानीत आपल्या फुटबॉलपटूच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. स्थानिक माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये अनेक चाहते रडताना दिसले.
राधी यांनी देशासाठी एकूण 121 सामने खेळले आणि 62 गोल केले. क्लब कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी क्लब (अल-जावरा, अल-वकरा, अल-रशिद फुटबॉल क्लब) या क्लबकडून 338 सामन्यांत 211 गोल केले.