ETV Bharat / sports

मॅराडोना यांचा मृत्यू दुर्लक्षपणामुळे? - maradona's doctor investigation

वकील माथियास मोरला यांनी मॅराडोना यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. मॅराडोना यांच्यावर उपचारांना उशीर झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Inverstigators search doctor's office in maradona death probe
मॅराडोना यांचा मृत्यू दुर्लक्षपणामुळे?
author img

By

Published : Nov 30, 2020, 7:19 PM IST

नवी दिल्ली - दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे खासगी डॉक्टर लियोपोल्डो लूक्यू हे चौकशीच्या फेरीत अडकले आहेत. मॅराडोना यांचा मृत्यू डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे झाला असावा, अशा संशयामुळे पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. मॅराडोना यांच्या वकिलांनी ही माहिती दिली. गेल्या बुधवारी मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

वकील माथियास मोरला यांनी मॅराडोना यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. मॅराडोना यांच्यावर उपचारांना उशीर झाल्याचा आरोप त्यांनी केला. प्राथमिक चौकशीत मॅराडोना यांची मुलगी डालमा, गिन्निना आणि जाना यांच्याकडून पुरावे मिळाल्यानंतर न्यायाधीशांनी चौकशीचे आदेश दिल्याचे मोरला यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - मेस्सीची मॅराडोना यांना 'खास' श्रद्धांजली

एका वृत्तानुसार, रविवारी पोलिसांनी लियोपोल्डो लूक्यू यांच्या घरी आणि खासगी क्लिनिकवर छापा टाकला. मॅराडोना यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी वैद्यकीय कर्मचार्‍यांकडून योग्य ती काळजी घेण्यात आली होती का?, याबद्दल पोलीस तपास करत आहेत.

कोरोना चाचणी निगेटिव्ह -

मॅराडोना मध्यंतरी ड्रग्ज आणि दारूच्या आहारी गेले होते. १९९१साली ड्रग्ज नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर १५ महिन्यांची बंदी घातली गेली होती. काही दिवसांपूर्वी मॅराडोना यांची कोरोना चाचणीदेखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. १९८६मध्ये त्यांनी अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.