ETV Bharat / sports

भारताचे महान फुटबॉलपटू चुन्नी गोस्वामी यांचं निधन - चून्नी गोस्वामी यांचे निधन

भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चुन्नी गोस्वामी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

indian football legend chuni goswami dies aged 82 due to cardiac arrest
भारताचे महान फुटबॉलपटू चून्नी गोस्वामी यांचं निधन
author img

By

Published : Apr 30, 2020, 7:55 PM IST

मुंबई - भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चुन्नी गोस्वामी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रुग्णालयातच त्यांनी अंतिम श्वास घेतला.

चुन्नी गोस्वामी यांच्या निधनाची बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा सुदिप्तो असा परिवार आहे. गोस्वामी हे १९६२मध्ये अशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने १९६४मध्ये उपविजेतापर्यंत मजल मारली होती. क्लब फुटबॉलमध्ये त्यांनी मोहन बागानचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे, वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.

त्यांनी भारतासाठी फुटबॉल खेळाडू म्हणून १९५६ ते १९६४ या काळात योगदान दिले. या काळात त्यांनी ५० सामने खेळले. तर एक क्रिकेटपटू म्हणून त्यांनी १९६२ ते १९७३ हा काळ गाजवला. या काळात त्यांनी ४६ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. या सामन्यांमधून त्यांनी पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व केले. चुन्नी यांना १९६३ साली अर्जुन आणि १९८३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

हेही वाचा - Video : दाक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जुनने मानले वॉर्नरचे आभार, जाणून घ्या कारण

हेही वाचा - काल इरफान आज ऋषी कपूर.. त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; सचिन विराटसह क्रिकेटविश्वातून श्रद्धांजलीचा ओघ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.