ETV Bharat / sports

भारताला तब्बल ४३ वर्षांनंतर मिळाले 'या' स्पर्धेचे यजमानपद

भारतात १९७९ नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल ४३ वर्षांनी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२२ साली या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) भारताला दिले आहेत.

author img

By

Published : Jun 6, 2020, 10:17 AM IST

India to host AFC Women's Asian Cup in 2022
भारताला तब्बल ४३ वर्षांनंतर मिळाले 'या' स्पर्धेचे यजमानपद

नवी दिल्ली - भारतात १९७९ नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल ४३ वर्षांनी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२२ साली या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) भारताला दिले आहेत. एएफसी महिला फुटबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. फेब्रुवारीत ही शिफारस करण्यात आली होती.

एएफसीने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला एक पत्र पाठवले आहे. यात एएफसी महासचिव दाटो विडसर जॉन म्हणाले, '२०२२ च्या आशिया चषक महिला फुटबॉलचे यजमानपद भारताला सोपविले आहे.'

भारताला आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान दिल्याबद्दल, आशियाई फुटबॉल परिसंघाचे, एआयएफएफ अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आभार मानले. तसेच त्यांनी, ही स्पर्धा महत्त्वाकांक्षी महिला फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारी ठरेल. भारतात महिला फुटबॉलमध्ये सामाजिक क्रांती आणणारी ही स्पर्धा असेल, असे म्हटलं आहे.

२०२२ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत १२ संघ सहभागी होतील. भारत यजमान असल्याने थेट सहभागी होईल. ही स्पर्धा २०२३ च्या फिफा महिला विश्वचषकाची पात्रता फेरी देखील असणार आहे. दरम्यान, भारतात पुढच्यावर्षी १७ वर्षांखालील महिला विश्वचषकाचे देखील आयोजन होणार आहे.

हेही वाचा - इंग्लिश फुटबॉल लीगचे 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

हेही वाचा - बार्सिलोनाचे पाच खेळाडू आणि दोन प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.