ETV Bharat / sports

फिफाच्या जागतिक क्रमवारीतून भारत 'TOP-१००' मधून बाहेर - क्रमवारी

भारतीय संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेत साखळी फेरीतूनच बाहेर पडल्यामुळे फिफाच्या क्रमवारीत भारताची ६ स्थानांनी घसरण झाली.

भारत वन
author img

By

Published : Feb 9, 2019, 12:00 AM IST

मुंबई - जागतिक फुटबॉल महासंघाच्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ 'TOP-१००' मधून बाहेर पडला आहे. ९७ व्या क्रमांकावरुन १०३ व्या स्थानी भारताची घसरण झाली आहे. भारतीय संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेत साखळी फेरीतूनच बाहेर पडल्यामुळे फिफाच्या क्रमवारीत भारताची ६ स्थानांनी घसरण झाली. फिफाच्या क्रमवारीत बेल्जियम अव्वल तर, फ्रान्स, ब्राझील अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.

आशियाई चषक स्पर्धेत भारताला ३ पैकी २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या सामन्यात बहारिनविरुद्ध १-० ने पराभव झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.

माजी प्रशिक्षक कॉन्स्टन्टाइन यांच्या कार्यकाळात भारताने फिफाच्या जागतिक क्रमवारीत १७३ व्या स्थानावरून ९६ व्या झेप घेतली होती. परंतु, भारताला आपल्या कामगिरीत सातत्य राखता न आल्याने क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. भारताला क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे.

Intro:Body:

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. मागील अनेक दिवसांपासून पुनरपरिक्षेचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे संतापून कार्यकर्त्यांनी हा पवित्रा घेतला. यामध्ये एका सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण करण्यात आली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.