पॅरिस - फ्रेंच फुटबॉल क्लब मार्सेलीचे माजी अध्यक्ष पेप डायफ यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. डायफ ६८ वर्षांचे होते. त्यांनी २००५ ते २००९ पर्यंत क्लबचे अध्यक्षपद भूषवले होते.
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, या क्लबने लीग एकमध्ये दोनदा द्वितीय क्रमांक मिळवला होता. शिवाय, मार्सेलीने दोन वेळा फ्रेंच कप फायनलमध्ये प्रवेश नोंदवला होता.
पेप हे क्लेबचा महान शिल्पकार म्हणून मार्सिलेच्या केंद्रस्थानी राहील, असे मार्सेलीने ट्विटरवर म्हटले आहे. फ्रान्स आणि लिव्हरपूलचे माजी स्ट्रायकर डजीब्रिल म्हणाले, की आज फ्रान्स फुटबॉलने एक महान व्यक्ती गमावला आहे. आज मी फारच दु: खी आहे. पेप यांच्या आत्म्यास शांत लाभो.