ETV Bharat / sports

धक्कादायक..! युवा फुटबॉलपटूचा बेदम मारहाणीत मृत्यू

२६ वर्षीय प्रदिप अलाट हा फुटबॉल प्रशिक्षक म्हणून शहरातील अनेक इंग्रजी शाळांमध्ये काम पाहत असे. शुक्रवारी अज्ञात तरुणांनी त्याला जबर मारहाण केली. प्रदिप या मारहाणीत गंभीर जखमी झाला. तेव्हा त्याला त्याला गंगामाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापुर्वीच मृत घोषित केले.

footballer pradip alat murder in solapur
बेदम मारहाणीत युवा फुटबॉलपटूचा मृत्यू
author img

By

Published : Dec 28, 2019, 1:24 PM IST

Updated : Dec 28, 2019, 3:21 PM IST

सोलापूर - शहरात अज्ञात तरुणांनी युवा फुटबॉलपटू प्रदिप अलाटला जबर मारहाण केली. प्रदिपचा या मारहाणीत मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय प्रदिप अलाट हा फुटबॉल प्रशिक्षक म्हणून शहरातील अनेक इंग्रजी शाळांमध्ये काम पाहत असे. शुक्रवारी अज्ञात तरुणांनी त्याला जबर मारहाण केली. प्रदिप या मारहाणीत गंभीर जखमी झाला. तेव्हा त्याला गंगामाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. महत्वाची बाब म्हणजे, मारहाण करणाऱ्या तरुणांनीच त्याला रुग्णालायत दाखल केले होते. डॉक्टरांनी प्रदिपला मृत घोषित केले. तेव्हा त्या तरुणांनी तिथून पळ काढला.

प्रदिप शहरातील सरस्वती विद्यालय, श्राविका विद्यालय, हिंदुस्थान कॉन्व्हेंट स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे देत होता. दरम्यान, प्रदिप उच्च शिक्षण घेत होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तो फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करत होता.

तक्रार दाखल -
प्रदिप अलाट प्रकरणात चेतन गायकवाड याच्यासह चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रदिपची आई उषा आलट यांनी ही तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून मित्रावर चाकू हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

हेही वाचा - महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकांच्या दोन गटात हाणामारी

Intro:mh_sol_01_murder_7201168

सोलापुरात फुटबॉलपटूचा खून, प्रदीप अलाट चा मारहाणीत झाला मृत्यू

सोलापूर-
सोलापुरातील तरुण फुटबॉलपटू असलेल्या प्रदीप अलाट या तरुणाचा खून झालाय. अज्ञात कारणावरून प्रदीप अलाट याला काही तरुणांनी जबर मारहाण केली आणि त्या मारहाणीत प्रदीप अलाट याचा मृत्यू झाला आहे. Body:प्रदिप विजय अलाट हा २६ वर्षीय फुटबॉल पटू आहे. प्रदीप हा सोलापुरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करत होता.
प्रदीप ला शुक्रवारी काही तरुणांनी अज्ञात कारणावरुन जबरी मारहाणात केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला गंगामाई हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापुर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मारहाण करणाऱ्यांनीच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते मात्र त्याला मयत घोषित केल्या नंतर सर्वजण तेथून पळून गेले.

प्रदीप अलाट हा सरस्वती विद्यालय, श्राविका विद्यालय, हिंदुस्थान कॉन्व्हेंट या शाळे मध्ये फुटबॉल चे प्रशिक्षण देत होता. प्रदिप हा गरीब घरचा असून तो उच्च शिक्षण घेत होता. उच्च शिक्षण घेत असताना तो शाळेत फुटबॉल प्रशिक्षक म्हणूनही काम करत होता.

Conclusion:
Last Updated : Dec 28, 2019, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.