नवी दिल्ली - जागतिक फुटबॉल संस्था फिफाचे अध्यक्ष गियानि इन्फॅंटिनो यांना कोरोनाची लागण झाली आहे. फिफाने मंगळवारी ही माहिती दिली. इन्फॅंटिनो यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली आहेत. यानंतर ते विलगीकरणात आहेत.
-
FIFA President Gianni Infantino has tested positive for COVID-19 pic.twitter.com/orNKLSQ08O
— International Champions Cup (@IntChampionsCup) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">FIFA President Gianni Infantino has tested positive for COVID-19 pic.twitter.com/orNKLSQ08O
— International Champions Cup (@IntChampionsCup) October 27, 2020FIFA President Gianni Infantino has tested positive for COVID-19 pic.twitter.com/orNKLSQ08O
— International Champions Cup (@IntChampionsCup) October 27, 2020
५० वर्षीय गियानि इन्फॅंटिनो यांच्या संपर्कात आलेल्यांना दक्षता बाळगण्यास फिफाने सांगितले आहे. एका दिवसापूर्वी, ब्राझीलचा दिग्गज माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रोनाल्डिन्हो सध्या बेलो होरिझोन्टेमध्ये विलगीकरणात आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह -
दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची दुसरी कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. ३५ वर्षीय रोनाल्डो विलगीकरणात आहे. लिस्बन येथे स्वीडनविरुद्धच्या संघाच्या नेशन्स लीग सामन्याच्या दोन दिवस आधी रोनाल्डो पॉझिटिव्ह आढळला.