ETV Bharat / sports

कोरोनाचा फटका; भारतात पुढीलवर्षी होणारा नियोजित विश्वकरंडक रद्द - १७ वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वकरंडक न्यूज

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फिफाने भारतात होणारा १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण असे असले तरी भारताला २०२२ मध्ये हा विश्वकरंडक आयोजित करण्याची संधी फिफाने दिली आहे.

FIFA cancels U-17 women's World Cup in India, allots it 2022 edition
कोरोनाचा फटका; भारतात पुढील वर्षी होणारा विश्वकरंडक रद्द
author img

By

Published : Nov 18, 2020, 4:15 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फटका क्रीडाविश्वाला देखील बसला आहे. अनेक स्पर्धा कोरोनामुळे रद्द किंवा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात भारतात होणारा १७ वर्षांखालील फिफा महिला विश्वकरंडकही रद्द करण्यात आला आहे. पण असे असले तरी भारताला २०२२ मध्ये हा विश्वकरंडक आयोजित करण्याची संधी फिफाने दिली आहे.

१७ वर्षांखालील फिफा महिला विश्वकरंडक ही स्पर्धा नोव्हेंबर २०२० मध्येच होणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान भारतात आयोजित करण्याचा निर्णय फिफाने घेतला होता. मात्र आता २०२१ मध्ये होणारी ही स्पर्धाही रद्द केली आहे. आता ही स्पर्धा २०२२ मध्ये हा भारतातच होईल.

या संदर्भात फिफाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. सर्व भागधारकांशी, सहभागी सदस्य संघटनांशी याबाबत सल्लामसलत आम्ही करत आहोत. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबत सुरक्षा आणि संभाव्य परिणामांवरही लक्ष ठेवून आहोत, असे त्यात म्हटलं आहे.

भारतात २०२२ मध्ये १७ वर्षांखालील फिफा महिला विश्वकरंडक होणार असल्याने, कोस्टा रिकामध्ये २०२२ ला २० वर्षांखालील फिफा महिला विश्वकरंडक होईल.

हेही वाचा - दिवंगत फुटबॉलपट्टूच्या कुटुंबाला क्रीडा मंत्रालयाकडून पाच लाखाची मदत

हेही वाचा - महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्यावर शस्त्रक्रिया, डॉक्टर म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.