ETV Bharat / sports

PSG क्लबसोबत जोडला गेल्यानंतर लिओनेल मेस्सीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... - पीएसजी क्बल

बार्सिलोना क्लब सोडणे हे माझ्यासाठी फार कठिण निर्णय होता. परंतु, फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मनशी जोडला गेल्यानंतर मी आनंदी आहे, असे लिओनेल मेस्सीने सांगितलं.

Exit from Barcelona has been a difficult change but the moment I arrived here, I've been very happy: Messi
PSG क्लबसोबत जोडला गेल्यानंतर लिओनेल मेस्सीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
author img

By

Published : Aug 11, 2021, 5:30 PM IST

पॅरिस - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सांगितलं की, बार्सिलोना क्लब सोडणे हे माझ्यासाठी फार कठिण निर्णय होता. परंतु, फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मनशी जोडला गेल्यानंतर मी आनंदी आहे.

मेस्सी बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाला की, बार्सिलोनामधून बाहेर पडणे हा मोठा कठीण निर्णय होता. पण मी जेव्हा पॅरिसला पोहोचलो. तेव्हा मला आनंद झाला. पहिल्या मिनिटापासून पॅरिसमध्ये मी माझा वेळ एन्जॉय करत आहे. मी खरचं भाग्यशाली आहे की, कराराच्या जटील गोष्टी सोप्या झाल्या. मला वाटतं की, आता हा क्लब प्रत्येक विजेतेपदाच्या लढ्यासाठी तयार आहे.

पीएसजीसोबत जोडला गेल्यानंतर मेसीने आनंद व्यक्त करत येथील संघ अविश्वसनीय असल्याचे म्हटलं. हा अनुभव माझ्यासाठी खास असणार असल्याचे देखील मेस्सीने सांगितलं.

दरम्यान मेस्सी पीएसजी क्लबकडून मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. याविषयी तो म्हणाला की, मला कल्पना नाही की मी या क्लबकडून कधी खेळेन कल्पना नाही. परंतु आशा आहे की मी प्री सीझन कंडिशनआधी याची सुरूवात करेन.

दरम्यान, पीएसजी क्लबने मेस्सीसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. यात मेस्सीला हा करार तीन वर्षे वाढवण्याची मुबा त्यांनी दिली आहे. मेस्सी क्लबसोबत जोडला गेल्यानंतर पीएसजीने आनंद व्यक्त केला.

दरम्यान, ब्राझीलचा स्ट्रायकर नेमार याने मंगळवारी मेस्सीसोबतचा एक फोटो इंन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता. याला त्याने बॅक टुगेदर, असे कॅप्शन दिले होते. नेमार देखील पीएसजी क्लबकडून खेळतो. याआधी ही जोडी बार्सिलोना क्लबकडून खेळत होती.

हेही वाचा - नीरज चोप्रा प्रशिक्षक वाद : नाईक यांनी केलं एएफआय प्रमुख सुमरिवाला यांच्या वक्तव्याचं खंडन

हेही वाचा - 17 हंगामानंतर पहिल्यादांच लिओनेल मेस्सीशिवाय स्पॅनिश लीगला होणार सुरूवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.