मुंबई - एफसी गोवासाठी इंडियन सुपर लीगचा २०२१ हंगाम विशेष ठरला. गोवा संघाने आतापर्यंत लीगमध्ये सहा वेळा प्ले ऑफ फेरी गाठली आहे. यंदाच्या हंगामात गोवा संघाने हैदराबाद एफसीला बरोबरीत रोखत सलग चौथ्यांदा प्ले ऑफचे तिकीट मिळवले. यादरम्यान, 'ईटीव्ही भारत'ने गोवा संघाचा फॉरवर्ड देवेंद्र मुंगरकर यांच्याशी खास बातचित केली. यात देवेंद्रने संघाची रणणिती तसेच मुंबई विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल सांगितले. देवेंद्र यांच्यासोबत केलेली बातचित प्रश्नोत्तराच्या स्वरूपात...
- प्रश्न - मुंबई सिटी एफसी या मोठ्या संघाविरुद्ध तुमचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी काही भिती वाटत आहे का?
उत्तर - प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही या क्षणासाठी मागील पाच महिन्यांपासून मेहनत घेत आहोत. आमचा क्लब मागील सात वर्षांपासून या स्पर्धेचा भाग आहे. यामुळे भिती वगैरे काही वाटत नाही. पण मला या सामन्याची उत्सुकता मात्र आहे.
- प्रश्न - एफसी गोवा सर्वश्रेष्ठ संघापैकी एक आहे, पण तुझ्या मते, गोवा संघाला उपांत्य सामना आणि अंतिम सामन्याआधी कोणत्या बाबींवर काम केलं पाहिजे?
उत्तर - मला वाटत की, हंगामात सातत्याने कामगिरी करणाऱ्या संघापैकी आमचा एक संघ आहे. आम्ही १३ सामने एकहाती जिंकले आहेत. पण काही वेळेला विरोधी संघ अचानक आक्रमण करत गोल करतं. यामुळे आम्हाला प्रत्येक क्षणाला सतर्क राहिले पाहिजे तसेच आम्हाला आमचे लक्ष्य आणखी केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.
- प्रश्न - पुढील सामन्यांत गोवा संघाने आक्रमक खेळ करण्यास प्राधान्य द्यायला हवे का? प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाकडून तुम्हाला काय मॅजेस मिळाला आहे?
उत्तर - व्यवस्थापनाकडून आम्हाला नेहमी तुम्ही तुमच्या शैलीत खेळ करा, असा मॅजेस दिला जातो. आम्ही फक्त चांगला खेळ करत चाहत्यांचे मनोरंजन करू इच्छित आहोत.
- प्रश्न - या हंगामात मुंबई सिटी एफसी प्रमाणे गोवा संघाला देखील तीन पराभवाला समोरे जावे लागले आहे. पण उपांत्य सामना याच दोन संघात होत असून हा सामना रोमांचक होईल का?
उत्तर - तुम्ही जर मुंबईविरुद्ध खेळले गेलेले आमचे मागील दोन सामने पाहिले तर आम्ही पहिल्या सामन्यात त्यांच्यावर वरचढ ठरलो. तर दुसरा सामना ३-३ ने बरोबरीत सुटला. यामुळे उपांत्य सामना देखील चाहत्यांच्या आपेक्षेप्रमाणे रोमांचक होईल.
- प्रश्न - एक खेळाडू म्हणून तुझा प्रवास कसा होता. आयएसएल भारतीय फुटबॉलमध्ये कसे योगदान देत आहे?
माझा प्रवास चांगला राहिला. मी एफसी गोवा आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो की, त्यांनी मला संधी दिली. आयएसएल ही एक अशी स्पर्धा आहे, ज्यातून युवा फुटबॉलपटू घडत आहेत. अशी संधी प्रत्येक खेळाडूला मिळत नाही.