ETV Bharat / sports

ईपीएलच्या सहाव्या फेरीत 1195 खेळाडू व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी

या चाचणीत 1195 खेळाडू व कर्मचार्‍यांचा समावेश होता. पहिल्या पाच फेऱ्यात 5079 खेळाडूंची चाचणी करण्यात आली. त्यात 13 जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना व्हायरसच्या कारणास्तव प्रीमियर लीग मार्चपासून पुढे ढकलण्यात आली होती. आता ही लीग 17 जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे.

epl announces zero new positive coronavirus cases after players and staff tested
ईपीएलच्या सहाव्या फेरीत 1195 खेळाडू व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी
author img

By

Published : Jun 7, 2020, 6:39 PM IST

लंडन - इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) कोरोना चाचणीची सहावी फेरी घेण्यात आली. या फेरीतीच चाचणीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. शुक्रवारी ही चाचणी घेण्यात आली.

या चाचणीत 1195 खेळाडू व कर्मचार्‍यांचा समावेश होता. पहिल्या पाच फेऱ्यात 5079 खेळाडूंची चाचणी करण्यात आली. त्यात 13 जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना व्हायरसच्या कारणास्तव प्रीमियर लीग मार्चपासून पुढे ढकलण्यात आली होती. आता ही लीग 17 जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे.

काल इंग्लिश प्रीमियर लीगने (ईपीएल) आपल्या नवीन वेळापत्रकाची घोषणा केली आहे. लीगचा पहिला सामना अ‍ॅस्टन व्हिला आणि शेफील्ड युनायटेडशी होईल. याच दिवशी संध्याकाळी मँचेस्टर सिटी आणि आर्सेनलचा संघ एकमेकांशी भिडतील. मँचेस्टर युनायटेडचा सामना 19 जूनला टोटेनहॅम हॉटस्परशी होईल. 25 गुणांसह अव्वल असलेला लिव्हरपूलचा संघ 21 जूनला एव्हर्टनशी टक्कर देईल. त्यानंतर 24 जूनला लिव्हरपूल क्रिस्टल पॅलेसविरूद्ध खेळेल. 2 जुलैला मॅन्चेस्टर सिटीविरूद्धही लिव्हरपूलचा संघ मैदानात उभा ठाकणार आहे.

ईपीएलने नुकत्याच तीन फेऱ्यांच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून 17 जून ते 2 जुलै या कालावधीत रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय हे सलग सामने खेळले जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.