नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी सुदेवा दिल्ली एफसी संघाचा शुभारंभ केला. हा संघ या हंगामात प्रथमच आय-लीगमध्ये खेळेल. यावर्षी आय-लीग ९ जानेवारीपासून कोलकाता येथे होणार आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे आय-लीग एका ठिकाणी आयोजित केली जात आहे.
संघाचा शुभारंभ करताना सिसोदिया म्हणाले, की आता नॅशनल लीगमध्ये दिल्लीचा संघ असेल आणि दिल्लीच्या लोकांना या संघाचा जयजयकार करण्याची संधी मिळेल. सुदेवा दिल्ली एफसी दिल्लीचा संघ आहे. प्रथमच दिल्लीचा फुटबॉल संघ आय-लीगमध्ये भाग घेत आहे. दिल्लीवासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे. ९ जानेवारी रोजी कोलकाता येथे आय-लीग सुरू होईल तेव्हा दिल्लीकर आपल्या संघाच्या सामन्यासाठी उत्सुक असतील आणि मला खात्री आहे की ते टीव्हीवर त्यांचा संघ पाहण्यास आतुर असतील".
![Deputy cm manish sisodia launches sudeva delhi fc](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/noname_2811newsroom_1606552524_700.png)
सुदेवा दिल्ली एफसीचे संस्थापक अनुज गुप्ता म्हणाले, "दिल्लीसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. यापूर्वी दिल्लीतील कोणताही संघ नॅशनल लीगमध्ये खेळला नाही. दिल्लीला संघ देण्याचे माझे स्वप्न होते. आता संघ तयार आहे. आम्ही भारतीय संघासह नॅशनल लीगमध्ये चमकण्यासाठी सज्ज आहोत. आमचे उद्दीष्ट चांगले खेळायचे आहे.''
फुटबॉल दिल्लीचे प्रमुख साजी प्रभाकरन म्हणाले, ''दिल्लीचा एक संघ असणे ही एक चांगली गोष्ट आहे. आशा आहे, की हा संघ दिल्लीच्या लोकांच्या हृदयाच्या जवळ राहील. येत्या काळात रोनाल्डो किंवा मेस्सी या संघातून बाहेर पडेल कारण भारतात प्रतिभेची कमतरता नाही, फक्त ती सुधारण्याची गरज आहे.''