रोम - पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोरोनाव्हायरसवर मात केली आहे. आयसोलेशन कालावधीनंतर रोनाल्डोची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. एका वृत्तानुसार, रोनाल्डो १३ ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर तो विलगीकरणात होता.
-
Juventus announce Cristiano Ronaldo tested negative for the coronavirus and no longer has to quarantine pic.twitter.com/pDPcIJy0Lm
— B/R Football (@brfootball) October 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Juventus announce Cristiano Ronaldo tested negative for the coronavirus and no longer has to quarantine pic.twitter.com/pDPcIJy0Lm
— B/R Football (@brfootball) October 30, 2020Juventus announce Cristiano Ronaldo tested negative for the coronavirus and no longer has to quarantine pic.twitter.com/pDPcIJy0Lm
— B/R Football (@brfootball) October 30, 2020
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रोनाल्डो पोर्तुगालसाठी एक आणि जुव्हेंटससाठी चार सामने खेळू शकला नाही. यामध्ये चॅम्पियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात बार्सिलोनाकडून ०-२ असा पराभव देखील सामील आहे. जुव्हेंटस आपला पुढील सामना रविवारी सेरी-ए येथे स्पेजिया विरुद्ध खेळणार आहे.
-
. @Cristiano recovers from Covid-19https://t.co/4etecyAw0O pic.twitter.com/YPZSm0My8A
— JuventusFC (@juventusfcen) October 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">. @Cristiano recovers from Covid-19https://t.co/4etecyAw0O pic.twitter.com/YPZSm0My8A
— JuventusFC (@juventusfcen) October 30, 2020. @Cristiano recovers from Covid-19https://t.co/4etecyAw0O pic.twitter.com/YPZSm0My8A
— JuventusFC (@juventusfcen) October 30, 2020
जुव्हेंटसने दिली माहिती -
"ख्रिस्तियानो रोनाल्डोची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. रोनाल्डो १९ दिवसानंतर बरा झाला आहे. त्याला आता आयसोलेशनमध्ये राहण्याची गरज नाही", असे जुव्हेंटसने सांगितले. कोरोना विषाणूचा फटका बसण्यापूर्वी रोनाल्डोने दोन लीग सामन्यांमध्ये जुव्हेंटसकडून तीन गोल केले. रोनाल्डोने ११ ऑक्टोबर रोजी लीग ऑफ नेशन्समध्ये फ्रान्सविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता. तेथे दोन्ही संघांना गोलरहित ड्रॉ सामना खेळावा लागला.