नवी दिल्ली - यंदाच्या सेरी-ए लीगमधील गोल्डन बुट जिंकण्याचे ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न धूळीस मिळणार आहे. रोनाल्डो या लीगच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे तो गोल्डन बुटच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर राहणार आहे.
नुकताच सेरी-ए लीगचा विजेता बनलेला जुव्हेंटस संघ लीगच्या शेवटच्या सामन्यात रोमाविरूद्ध खेळणार आहे. जुव्हेंटसने या सामन्यासाठी संघ जाहीर केला असून रोनाल्डोला या संघात स्थान मिळालेले नाही. याचा अर्थ असा, की रोनाल्डोला लीगमधील सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळणार आहे.
रोनाल्डोने आत्तापर्यंत या लीगमध्ये एकूण 31 गोल केले आहेत. तो लाजियोच्या सीरो इमोबाईलपेक्षा चार गोल मागे आहे. शेवटच्या सामन्यात सीरोला नेपोलीविरुद्ध खेळावे लागणार्या सामन्यात गोलसंख्या वाढवण्याची संधी आहे.
चॅम्पियन्स लीगच्या सोळाव्या फेरीतील लायन विरुद्धच्या सामन्यास डोळ्यासमोर ठेवून जुव्हेंटसचे मॅनेजर मॉरिजिओ सारी यांनी शेवटच्या सामन्यात रोनाल्डोला विश्रांती देण्याचे संकेत दिले होते.
गोल डॉट कॉमनुसार सारी म्हणाले, "आज आणि उद्याची परिस्थिती आपण पाहूया, कोणास विश्रांती हवी आहे आणि कोण खेळायला तंदुरुस्त आहे यावर सर्व अवलंबून आहे."