नवी दिल्ली - पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर हिट ठरला आहे. या अॅपवर रोनाल्डोचे २०० मिलियन फॉलोअर्स झाले असून अशी कामगिरी करणारा तो पहिला व्यक्ती ठरला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीम अंतिम फेरीत, आता झुंज जोकोविचशी
फॉलोअर्सचा इतका मोठा आकडा गाठल्यानंतर, रोनाल्डोने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'पाच वेळा बॅलन डी ऑरचा विजेता असलेल्या रोनाल्डोला इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रायोजित पोस्टला ९ लाख युरो मिळतात', असे एका इन्स्टाग्राम मार्केटिंग कंपनीने अलीकडे सांगितले होते.
![Cristiano Ronaldo 200 Million Instagram Followers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5897825_instagram_0102newsroom_1580523410_277.jpg)
फुटबॉलमधून रोनाल्डोला दरवर्षी ३४ मिलियन डॉलर्स तर, इन्स्टाग्राममधून त्याला ४.८ कोटी युरोचे वेतन मिळते. हे वेतन जुवेंटसकडून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. बार्सिलोनास्टार लिओनेल मेस्सीचे इन्स्टाग्रामवर १४० मिलियन फॉलोअर्स असून त्याला इन्स्टाग्राममधून २.३३ कोटी युरोचे वेतन मिळते.