ETV Bharat / sports

Copa America २०२१ : लुकास पॅकिएस्टाच्या गोल; ब्राझील पेरूला नमवत फायनलमध्ये

ब्राझील कोपा अमेरिका २०२१ च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. सोमवारी ब्राझीलने सेमीफायनलमध्ये पेरूचा १-० ने पराभव केला.

copa-america-2021-brazil-reached-in-final-after-defeating-peru-by-1-0-in-semifinal
Copa America २०२१ : लुकास पॅकिएस्टाच्या गोलच्या जोरावर ब्राझील फायनलमध्ये, सेमीफायनलमध्ये पेरूला नमवले
author img

By

Published : Jul 6, 2021, 4:10 PM IST

Updated : Jul 6, 2021, 4:23 PM IST

रिओ दि जेनेरो - ब्राझील कोपा अमेरिका २०२१ च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. सोमवारी ब्राझीलने सेमीफायनलमध्ये पेरूचा १-० ने पराभव केला. आता फायनलमध्ये यजमान संघाचा सामना अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. दरम्यान, २०१९ सालच्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या फायनलमध्ये ब्राझील आणि पेरू यांच्यात सामना झाला होता. यात ब्राझीलने पेरूचा ३-१ ने पराभव करत विजेतेपद पटकावले होते.

नेमार गोल करण्यात अपयशी...

सोमवारी रात्री ब्राझील विरुद्ध पेरू यांच्यात सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात बलाढ्य ब्राझील संघाचे पारडे जड होते. परंतु, पेरूचा संघ काही उलटफेर करणार का याची उत्सुकता होती. परंतु ब्राझीलने पेरूच्या खेळाडूंना तशी संधी दिलीच नाही. पण ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार या सामन्यात गोल करण्यात अपयशी ठरला. असे असले तरी ब्राझीलने मारलेला एक गोल त्याच्या असिस्टमुळे झाला.

ब्राझीलच्या स्ट्रायकर्संचा हल्ला...

ब्राझीलने सुरुवातीपासूनच पेरूवर वर्चस्व राखले. नेमारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ब्राझील संघाचे स्ट्रायकर्सं पेरूच्या गोलजाळीवर तुटून पडले. परंतु, पेरूच्या गोलकीपरने त्याचे हल्ले परतावून लावले. पण सामन्याच्या ३४व्या मिनिटाला ब्राझीलने गोल केला. नेमारकडून पास मिळाल्यानंतर १७व्या क्रमांकाची जर्सी परिधान केलेल्या लुकास पॅकिएस्टाने हा गोल केला. पेरूच्या संघाला त्यानंतर बरोबरी साधता आली नाही आणि ब्राझीलने हा सामना १-०ने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला.

सामन्यानंतर लुकास पॅकिएस्टाने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, हा एक संघर्षपूर्ण सामना होता. विरोधी संघ खूप मजबूत होता. पण आम्ही कठीण परिस्थितीत देखील विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. नेमारने संघाची कौतूक करताना सांगितलं की, सर्वोत्कृष्ट खेळ अद्याप बाकी आहे. तसेच त्याने पॅकिएस्टाचे कौतूक करताना, तो एक मोठा खेळाडू असल्याचे सांगितलं.

हेही वाचा - रॉजर फेडरर : इंग्लंड ग्रँडस्लॅम इतिहासात उपांत्यपूर्व फेरी गाठणारा वयस्कर खेळाडू

हेही वाचा - Big Braking! पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण

Last Updated : Jul 6, 2021, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.