ETV Bharat / sports

Copa America २०२१ : अर्जेंटिना आणि कोलंबिया उपांत्य फेरीत, उरुग्वे आणि इक्वेडोर बाहेर - इक्वेडोर

कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील, पेरु पाठोपाठ अर्जेंटिना आणि कोलंबिया संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत ब्राझील विरुद्ध पेरु आणि अर्जेंटिना विरुद्ध कोलंबिया असा सामना रंगणार आहे.

copa-america-2021-argentina-beat-ecuador-colombia-beat-uruguay-enters-semi-final
Copa America २०२१ : अर्जेंटिना आणि कोलंबिया उपांत्य फेरीत, उरुग्वे आणि इक्वेडोर बाहेर
author img

By

Published : Jul 4, 2021, 4:33 PM IST

रिओ दि जेनेरो - कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील, पेरु पाठोपाठ अर्जेंटिना आणि कोलंबिया संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत ब्राझील विरुद्ध पेरु आणि अर्जेंटिना विरुद्ध कोलंबिया असा सामना रंगणार आहे. या सामन्याची प्रचंड उत्सुकता फुटबॉलप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे.

कोलंबिया संघाने उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेचा पेनाल्टी शूटऑऊटमध्ये ४-२ ने पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. तर अर्जेंटिनाने इक्वाडोरविरुद्धच्या सामन्यात ३-० ने दणदणीत विजय मिळवत थाटात उपांत्य फेरीत धडक दिली.

उपांत्य फेरीत ब्राझील विरुद्ध पेरु यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान, आधी हे दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने झाले होते. यात ब्राझीलने पेरूचा ४-०ने धुव्वा उडवला होता. उपांत्य फेरीत देखील ब्राझील संघाचे पारडे जड मानले जात आहे. उपांत्य फेरीत दिग्गज संघाचे आव्हान असल्याने पेरूच्या संघाला संपूर्ण ताकतीनिशी खेळ करावा लागणार आहे.

कोपा अमेरिका स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना अर्जेंटिना विरुद्ध कोलंबिया या संघात होणार आहे. पण साखळी फेरीतील अर्जेंटिना संघाची कामगिरी पाहता त्यांचे या सामन्यात पारडे जड आहे. लियोनेल मेस्सी सद्या फॉर्मात असून त्याला रोखणे कोलंबिया संघासमोरील मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे या दोन संघातून कोणता संघ अंतिम फेरी गाठतो, याची उत्सुकता लागून लागली आहे.

हेही वाचा - मिताली राजने रचला इतिहास, एकाच दिवसात तोडले २ विश्वविक्रम

हेही वाचा - Euro २०२० : इंग्लंडच्या विजयात हॅरी केनचे 'दे दनादण गोल', उपांत्य फेरीत गाठ डेन्मार्कशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.