माद्रिद - अल्वारो नेगाराडोच्या निर्णायक गोलमुळे स्पॅनिश लीग ला-लीगा सामन्यात कॅडिजने बार्सिलोनाला २-१ असे हरवले. एका वृत्तानुसार, १९९१ नंतर प्रथमच ला-लीगामध्ये कॅडिजने बार्सिलोनाला पराभूत केले. या विजयात गिमेंजने ८व्या आणि निग्रोने ६३व्या मिनिटाला गोल केला. बार्सिलोनाकडून ५७व्या मिनिटाला अल्कलाने गोल केला.
हेही वाचा - फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने नोंदवले ऐतिहासिक शतक
२००६ नंतर लीगमधील मजबूत संघाविरूद्ध कॅडिजचा हा पहिला विजय आहे. या विजयानंतर कॅडीजचा संघ १२ सामन्यांत १८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला. बार्सिलोना १० सामन्यांत १४ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.