मुंबई - इंडियन सुपर लीग (आयएसएल) चा विजेता संघ मुंबई सिटी एफसीने भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू बिपीन सिंह सोबतचा करार वाढवला आहे. वर्ष २०२५ पर्यंत बिपीनचा करार वाढवण्यात आला आहे. मुंबई सिटी एफसीने सोमवारी याची घोषणा केली.
मणिपूरचा २६ वर्षीय बिपीन याने आयएसएलच्या सातव्या हंगामात ओडिशा एफसीविरुद्धच्या सामन्यात शानदार प्रदर्शन केले होते. त्याने या सामन्यात हॅट्ट्रिक गोल केला होता.
याशिवाय बिपीनने अंतिम सामन्यात एटीके मोहन बागानविरुद्ध ९०व्या मिनिटाला गोल करत मुंबई सिटीला पहिल्यादां आयएसएलचे विजेतेपद पटकावून दिले होते.
बिपीनने आतापर्यंत मुंबई सिटी एफसीसाठी ४५ सामने खेळली आहेत. आयएसएलच्या ७ व्या हंगामातील २२ सामन्यात त्याने सहा गोल आणि चार असिस्ट केले आहेत.
हेही वाचा - ISL-७ : एटीके मोहन बागानचा पराभव करत मुंबई सिटी एफसीने पटकावले जेतेपद
हेही वाचा - बार्सिलोनाचे विक्रमी जेतेपद, ३१व्यांदा जिंकला कोपा डेल रे कप