ETV Bharat / sports

बायर्न म्युनिकने पटकावला 'सुपरकप'

author img

By

Published : Sep 26, 2020, 6:20 PM IST

यूईएफए सुपरकपच्या सामन्यासाठी बायर्न म्युनिक आणि सेविला यांच्यात लढत रंगली होती. अतिरिक्त वेळेत जावी मार्टिनेझने गोल करत बायर्नचे विजेतेपद निश्चित केले.

Bayern munich win uefa super cup by defeating sevilla
बायर्न म्युनिकने पटकावला 'सुपरकप'

नवी दिल्ली - यंदा कोरोनामुळे संपूर्ण जगाची स्थिती बिघडली असली, तरी जर्मनीचा फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकसाठी २०२० हे वर्ष उत्तम ठरले आहे. यंदाच्या वर्षात बायर्नने चौथ्या विजेतेपदाला गवसणी घातली. बायर्नने सेविलाला २-१ असे पराभूत करून सुपरकप पटकावला आहे.

यूईएफए सुपरकपच्या अंतिम सामन्यासाठी बायर्न म्युनिक आणि सेविला यांच्यात लढत रंगली होती. सामन्याच्या तेराव्या मिनिटाला लुकास ओकॅम्पोसने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करत सेविलासाठी पहिला गोल केला. त्यानंतर, बायर्नच्या लिओन गोरेत्झकाने ३४व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी गोलचे प्रयत्न केले, पण पूर्ण वेळेत हा सामना १-१ अशा बरोबरीत होता. अतिरिक्त वेळेत जावी मार्टिनेझने गोल करत बायर्नचे विजेतेपद निश्चित केले.

सुपरकपचा सामना चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीगच्या विजेता यांच्यात खेळला जातो. या सामन्यादरम्यान स्टेडियमवर १५१८० प्रेक्षक उपस्थित होते. बायर्न मागील ३२ सामन्यांपासून अजिंक्य आहे. २०२०मध्ये बायर्नची ही चौथी ट्रॉफी आहे. या क्लबने बुंडेस्लिगा, जर्मन कप आणि चॅम्पियन्स लीग ट्रॉफी देखील जिंकली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.