बार्सिलोना - कर्णधार लियोनेल मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने एथलेटिक बिल्बाओचा ४-० ने पराभव करत कोपा डेल रे कप जिंकला. बार्सिलोनाचे हे विक्रमी ३१वे जेतेपद ठरले.
बार्सिलोनाचा या हंगामातील हा सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासह जानेवारी महिन्यात स्पॅनिश सुपर कपमध्ये एथलेटिक बिल्बोओकडून मिळालेल्या पराभवाचा बदला देखील बार्सिलोनाने घेतला.
-
🏆 A trophy forged at 𝘓𝘢 𝘔𝘢𝘴𝘪𝘢 💙❤️ pic.twitter.com/EH77j9LwDK
— FC Barcelona (@FCBarcelona) April 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🏆 A trophy forged at 𝘓𝘢 𝘔𝘢𝘴𝘪𝘢 💙❤️ pic.twitter.com/EH77j9LwDK
— FC Barcelona (@FCBarcelona) April 17, 2021🏆 A trophy forged at 𝘓𝘢 𝘔𝘢𝘴𝘪𝘢 💙❤️ pic.twitter.com/EH77j9LwDK
— FC Barcelona (@FCBarcelona) April 17, 2021
शनिवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. पण दुसऱ्या हाफमध्ये बार्सिलोना संघाचा खेळाडू एंटोनियो ग्रिजमॅन याने ६० व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर पुढील तीन मिनिटातच फ्रेंकी डी जोंगने गोल करत बार्सिलोनाला २-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मेस्सीने ६८ आणि ७२ व्या मिनिटाला गोल करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.
दरम्यान, ३३ वर्षीय अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीचा बार्सिलोना क्लबशी या हंगामाच्या अखेरीस करार संपणार आहे. अशात तो पुढील हंगामात पेरिस सेंट जर्मेन किंवा मॅनचेस्टर युनायटेड संघासोबत जोडला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
हेही वाचा - ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा सर्वश्रेष्ठ
हेही वाचा - ISL-७ : एटीके मोहन बागानचा पराभव करत मुंबई सिटी एफसीने पटकावले जेतेपद