बार्सिलोना - स्पेनचा फुटबॉल क्लब बार्सिलोनाचे अध्यक्ष जोसेफ मारिया बोर्टोमेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सँड्रो रसेलच्या जागी बार्टोमेन २०१४मध्ये बार्सिलोना एफसीचे नवे अध्यक्ष झाले होते. बोर्टोमेन तसेच उर्वरित बोर्ड संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी ९० दिवसांच्या आत निवडणुका घेण्यात येणार आहेत.
-
President Josep Maria Bartomeu announces the resignation of the FC Barcelona Board of Directors. pic.twitter.com/Xr9pBoUzHM
— FC Barcelona (@FCBarcelona) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">President Josep Maria Bartomeu announces the resignation of the FC Barcelona Board of Directors. pic.twitter.com/Xr9pBoUzHM
— FC Barcelona (@FCBarcelona) October 27, 2020President Josep Maria Bartomeu announces the resignation of the FC Barcelona Board of Directors. pic.twitter.com/Xr9pBoUzHM
— FC Barcelona (@FCBarcelona) October 27, 2020
बार्टोमेन म्हणाले, ''हा एक विचारपूर्वक, शांत डोक्याने, आणि सामुहिकपणे राजीनामा घेण्याचा निर्णय आहे. यात मला प्रामाणिकपणा आणि बांधिलकीने पाठिंबा दर्शवलेले आणि बार्सिलोनासाठी योगदान दिलेले लोक आहेत.''
''बार्सिलोनाने नवीन युरोपियन सुपर लीगमध्ये जाण्यास सहमती दर्शविली आहे. यामध्ये सामील झाल्याने क्लबच्या आर्थिक स्थिरतेची हमी मिळेल'', असे बार्टोमेन यांनी म्हटले आहे. ५७ वर्षीय बार्टोमेन यांनी प्रस्तावित सुपर लीगची कोणतीही माहिती उघड केली नाही.