माद्रिद - स्पॅनिश लीग ला लीगा क्लब एफसी बार्सिलोनाने आपला विजयीरथ कायम ठेवला आहे. कॅम्प नाऊ स्टेडियमवर प्रेक्षकांशिवाय खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी लेगनेसला 2-0 ने हरवले. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या या सामन्यात बार्सिलोनाकडून कर्णधार लिओनेल मेसी आणि अन्सू फाती यांनी गोल केले.
-
THERE'S N⚽️ PLACE LIKE H⚽️ME! pic.twitter.com/xpuygN0oSC
— FC Barcelona (@FCBarcelona) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">THERE'S N⚽️ PLACE LIKE H⚽️ME! pic.twitter.com/xpuygN0oSC
— FC Barcelona (@FCBarcelona) June 16, 2020THERE'S N⚽️ PLACE LIKE H⚽️ME! pic.twitter.com/xpuygN0oSC
— FC Barcelona (@FCBarcelona) June 16, 2020
शनिवारी मालोर्कावर 4-0 ने विजय मिळवल्यानंतर बार्सिलोनाचे प्रशिक्षक क्वेक्वे सेटीनने अनेक बदलांसह आपला संघ मैदानात उतरवला होता. सामन्याच्या 35 व्या मिनिटाला अँटोनियो ग्रिझमॅनचा हेडर चुकला. परंतु 42 व्या मिनिटाला फातीने बार्सिलोनाला गोल करून आघाडी मिळवून दिली.
दुसर्या हाफमध्ये मेस्सीने 69 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून बार्सिलोनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. या हंगामातील मेस्सीचे हा 21 वा गोल होता. बार्सिलोनाने आपला प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदवर पाच गुणांची आघाडी घेतली आहे. बार्सिलोनाचे आता 29 सामन्यांत 64 गुण आहेत तर रिअलचे 28 सामन्यांत 59 गुण आहेत.