ETV Bharat / sports

अफगाण फुटबॉलपटूच्या मृत्यू : त्याला पायांनी रचायचा होता इतिहास, पण तालिबानच्या दहशतीने संपले आयुष्य - Death of a young Afghan footballer

अमेरिकन सैन्य विमान सी -17 च्या व्हिल वेलमध्ये एक तरुणाचा अवशेष आढळून आला असून यात अफगाणचा युवा फुटबॉलपटू फुटबॉलपटू झाकी अन्वारी याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विमान दोहामध्ये उतरले तेव्हा विमानाच्या चाकात अफगाण फुटबॉलपटूचे अवशेष सापडले.

अफगाण फुटबॉलपटूच्या मृत्यू
अफगाण फुटबॉलपटूच्या मृत्यू
author img

By

Published : Aug 20, 2021, 7:38 PM IST

काबूल - काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोहासाठी निघालेल्या अमेरिकन लष्करी विमानात अडकून मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 19 वर्षीय अफगाणिस्तानचा फुटबॉलपटू झाकी अन्वारीचा समावेश आहे. रिपोर्टनुसार विमान दोहामध्ये उतरले तेव्हा विमानाच्या चाकात अफगाण फुटबॉलपटूचे अवशेष सापडले.

फ्रांस24 डॉट कॉममधील एका अहवालानुसार, ज्या असंख्य लोकांनी अफगाणीस्तान देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि विमानतळ गाठले त्यापैकी अन्वारी एक होता. विमानाच्या धावपट्टीवर खूप गर्दी झाल्यानंतर काही जणांनी अमेरिकन सैन्य विमानाचे पंख आणि चाकांवर घट्ट पकडून बसत विमानासोबत उड्डान केले होते. त्यातील काही जण विमान उडताच हवेत फेकले गेल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते.

अहवालात म्हटले आहे की झाकी हा हायस्कूलचा विद्यार्थी होता आणि देशाच्या राष्ट्रीय कनिष्ठ फुटबॉल संघाचा सदस्य होता. डेलीमेल डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, झाकी हा अमेरिकन इव्हॅक्युएशन विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये अडकला होता.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, कतारमध्ये विमान आल्यावर, अमेरिकन सी -17 वाहतूक जेटच्या व्हिल वेलमध्ये अन्वारीचे अवशेष सापडले. त्याच्या फुटबॉल संघाने, खोरोसन लायन्सने सांगितले की अमेरिकन सी -17 ट्रांसपोर्ट जेटमधून चाकावरुन उड्डान केलेल्यांपैकी एक तरुण होता.

सोमवारी काबूल विमानतळावरी अनेक फोटो व्हायरल झाले होते, ज्यात हजारो लोक अमेरिकन हवाई दलाच्या जहाजासह धावपट्टीवर धावत होते. काही लोक त्यावर लटकण्याचा प्रयत्न करत होते. अफगाणिस्तानच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा महासंचालनालयाने फेसबुक पोस्टद्वारे अन्वारीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

फुटबॉलपटू अन्वारीची स्वप्ने अपूर्ण राहिली. तो 19 वर्षांचा मुलगा मोठा खेळाडू बनू शकला असता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याची निरागसता दिसून येते. आयुष्यात मोठे होऊन काही तरी करायची त्याची इच्छा होती. कदाचित म्हणूनच त्याला अफगाणिस्तान सोडायचे होते. तो विमानापर्यंत पोहोचला मात्र विमानात प्रवेश करु शकला नव्हता. मग त्याने विमानाला लटकण्याचे साहस केले. हा धोका होता. पण देशात राहण्यापेक्षा हे साहस करणे त्याला जास्त योग्य वाटले असेल.

हेही वाचा - शाहरुखची मुलगी सुहाना किशोरवयीन रोमँटिक ड्रामामधून करणार पदार्पण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.