मुंबई - झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान, एक विचित्र घटना पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये स्टंपच्या जवळ फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक नव्हता, तरीही स्टम्पवरील बेल्स खाली पडल्या. बांगलादेशच्या डावातील 18व्या षटकामध्ये हा प्रकार घडला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं -
बांगलादेशच्या फलंदाजी दरम्यान, 18व्या षटकात मोहम्मद सैफूद्दीन स्ट्राइकवर फलंदाजी करत होता. तर समोर गोलंदाजीसाठी झिम्बाब्वेचा तेंदई चतरा होता. या षटकातील 5व्या चेंडूवर सैफूद्दीनने पूल शॉट मारला. पण मागे वळून पाहिले तर स्टम्पवरिल बेल्स खाली पडल्या होत्या. आपण हिट विकेट झालो तर नाही ना? असा सैफूद्दीनला प्रश्न पडला.
ही घटना पूर्णपणे विचित्र होती. याचा शोध लावण्यासाठी टीव्ही पंचाची मदत घेण्यात आली. तेव्हा रिप्लेमध्ये सर्व प्रकार उघडकीस आला. सैफूद्दीनचा पाय स्टम्पपासून खूप लांब होता. यामुळे तो हिट विकेट झाला नाही. हे निश्चित झाले. परंतु, स्टम्प वरिल बेल्स खाली कशा पडल्या, याचा शोध लागू शकला नाही.
-
First ever wicket taken by a ghost 😛😂 pic.twitter.com/9vG0BI50S4
— Mazher Arshad (@MazherArshad) July 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">First ever wicket taken by a ghost 😛😂 pic.twitter.com/9vG0BI50S4
— Mazher Arshad (@MazherArshad) July 24, 2021First ever wicket taken by a ghost 😛😂 pic.twitter.com/9vG0BI50S4
— Mazher Arshad (@MazherArshad) July 24, 2021
सोशल मीडियावर सद्या या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एकाने या व्हिडिओला, क्रिकेट मॅचमध्ये भूताने घेतलेली पहिली विकेट, असे कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : मानल राव! 13 वर्षीय मुलीने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं सुवर्ण पदक
हेही वाचा - Tokyo Olympics: रौप्य विजेती मीराबाई चानूला मिळू शकतं सुवर्णपदक, चीनी खेळाडूची होणार डोपिंग चाचणी