ETV Bharat / sports

India Test team : ऋषभ पंतबाबत युवराज सिंगचे मोठे वक्तव्य, म्हणाला... - Rishabh Pant for test team captaincy

ऋषभ पंतची आतापर्यंतची कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द ( Rishabh Pant Test career ) चांगली राहिली आहे. त्याने परदेशात काही चांगल्या खेळी खेळल्या आणि भारताला मालिका जिंकण्यास मदत केली. युवराज सिंग यावेळी पंतबद्दल काय म्हणतो ते जाणून घ्या.

Rishabh Pant
Rishabh Pant
author img

By

Published : Apr 27, 2022, 7:38 PM IST

नवी दिल्ली: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने ( Former all-rounder Yuvraj Singh ) यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant ) भविष्यातील कसोटी कर्णधार म्हणून तयार करावे, असे आवाहन राष्ट्रीय निवडकर्त्यांना केले आहे. 24 वर्षीय खेळाडूने अलिकडच्या वर्षांत आपल्या खेळात खूप सुधारणा केली आहे. 2018 मध्ये पदार्पण केल्यापासूनच पंत कसोटी संघातील अविभाज्य सदस्यांपैकी एक आहे. त्याने 30 सामन्यांमध्ये 40.85 च्या सरासरीने 1,920 धावा केल्या, ज्यात त्याच्या नावावर चार शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. विकेटकीपिंगमध्ये पंतने 107 झेल आणि 11 स्टंपिंग केले आहेत.

सध्या, पंत 2021 मध्ये फ्रँचायझीचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर आयपीएलच्या 2022 हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. 20 वर्षीय पंत यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 2017/18 रणजी ट्रॉफीमध्ये उपविजेतेपदासाठी दिल्लीचे नेतृत्व केले. युवराज म्हणाला, तुम्ही एखाद्याला कर्णधार म्हणून तयार करा. जसे एमएस धोनी कर्णधार झाला. विकेटकीपर नेहमीच चांगला विचारक असतो, कारण तो गोष्टी जवळून पाहतो.

भारतासाठी 40 कसोटी सामने खेळलेला युवराज पुढे म्हणाला, तुम्ही तरुण पंतची निवड करा जो भविष्याचा कर्णधार होऊ शकेल. त्यांना वेळ द्या आणि पहिल्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात परिणामांची अपेक्षा करू नका. चांगले काम करण्यासाठी तुम्ही तरुणांवर विश्वास ठेवावा असे मला वाटते. 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयी संघाचा सदस्य असलेल्या युवराज सिंगने पंतच्या परिपक्वतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांनाही उत्तर दिले.

तो पुढे म्हणाला, मी त्या वयात अपरिपक्व होतो, विराट कोहली अपरिपक्व होता. त्या वयात जेव्हा तो कर्णधार होता. पण पंत काळानुसार परिपक्व होत आहे. सहाय्यक कर्मचारी याबद्दल काय विचार करतात हे मला माहित नाही. पण कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी तोच योग्य व्यक्ती आहे, असे मला वाटते.

युवराजने पुढे खुलासा केला की, पंतसोबतच्या संभाषणात तो अनेकदा ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टचे ( Wicketkeeper Adam Gilchrist ) उदाहरण देतो, ज्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 17 कसोटी शतके झळकावली आहेत.

हेही वाचा - IPL 2022 Points Table : आयपीएलच्या 39 व्या सामन्यानंतर अशी आहे गुणतालिका; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.