ETV Bharat / sports

WTC Final : सेहवागने एका दगडात मारले २ पक्षी मारले, ICCसह टीम इंडियाला धुतलं

सेहवागने ट्विटच्या माध्यमातून, पहिल्या डावांत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा समाचार घेतला आहे. याच ट्विटमधून त्याने आयसीसीवरही टीका केली आहे. ना फलंदाजांना योग्यरित्या वेळ मिळाला, ना आयसीसीला, असे म्हणतं त्याने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

WTC Final: Virender Sehwag takes a funny dig at ICC after Day 4 gets washed out due to rain
WTC Final : सेहवागने एका दगडात मारले २ पक्षी मारले, ICC सह टीम इंडियाला धुतलं
author img

By

Published : Jun 22, 2021, 3:57 PM IST

मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता बळावली आहे. कारण अंतिम सामन्याचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. आजच्या पाचव्या दिवसाचा खेळही पावसामुळे उशीराने सुरू होणार आहे. साउथम्पटन येथील हवामानाचा लहरीपणा लक्षात घेता उर्वरीत दोन दिवसांत १९६ षटकांचा खेळ होणे अशक्य आहे. यामुळे भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. इतका महत्वाचा सामना हवामानाकरिता बेभरवसा असलेल्या इंग्लंडच्या भूमीत का आयोजित केला याविषयावरून अनेक जणांनी आयसीसीला लक्ष्य केलं आहे. यात भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागची भर पडली असून त्याने आयसीसी आणि भारतीय संघ यांना फैलावर घेतलं आहे.

सेहवागने ट्विटच्या माध्यमातून, पहिल्या डावांत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा समाचार घेतला आहे. याच ट्विटमधून त्याने आयसीसीवरही टीका केली आहे. ना फलंदाजांना योग्यरित्या वेळ मिळाला, ना आयसीसीला, असे म्हणतं त्याने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. विरेंद्र सेहवागच्या आधी इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन याने देखील आयसीसीवर कडाडून टिका केली आहे.

न्यूझीलंडची सामन्यावर पकड

काइल जेमिसनच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातलं. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. यात जेमिसनने २२ षटके फेकत ३१ धावांत ५ गडी बाद केले. २६ वर्षीय गोलंदाजांने तब्बल १२ षटके निर्धाव फेकली. भारताचा डाव २१७ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या सलामीवीर जोडीने अर्धशतकी सलामी दिली. लॅथम आणि कॉनवे या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. अश्विनने लॅथमला (३०) विराटकडे झेल देण्यास भाग पाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर कानवे आणि विल्यमसन या जोडीने न्यूझीलंडला शंभरी गाठून दिली. यादरम्यान, कानवेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इशांत शर्माने कानवेला (५४) बाद केलं. त्याचा झेल शमीने टिपला. केन विल्यमसन १२ तर अनुभवी रॉस टेलर शून्यावर नाबाद आहेत. न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा जमवल्या असून ते अजून ११६ धावांची पिछाडीवर आहेत.

हेही वाचा - Live Ind vs NZ WTC Final : पावसामुळे सामन्याला सुरुवात होण्यास विलंब

हेही वाचा - VIDEO: षटकार खेचल्यानंतर फलंदाजावरच आली डोक्याला हात लावून घेण्याची वेळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.