ETV Bharat / sports

WTC final: भारत विरुध्द न्यूझिलंड सामन्याच्या पहिल्या दिवसावर पाणी - साऊथॅम्प्टनमध्ये जोरदार पाऊस

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियसाठी भारत आणि न्यूझिलंड यांच्यात अंतिम सामना होत असून संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी साऊथॅम्प्टनमध्ये जोरदार पाऊस पडला. नाणेफेकही होऊ शकली नाही. अखेर आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.

WTC final: Toss delayed
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनसाठी भारत आणि न्यूझिलंड सज्ज
author img

By

Published : Jun 18, 2021, 3:42 PM IST

Updated : Jun 18, 2021, 8:22 PM IST

साऊथॅम्प्टन - जगभरातील कोट्यावधी क्रिकेट चाहते वा ज्या क्षणाची वाट पहात होते, तो क्षण आता आला आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली जागतिक कसोटी स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा महासंघर्ष सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे आज सुरू होणार होता. मात्र येथे झालेल्या जोरदार पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावर पाणी फिरले आहे. अखेर आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.

  • UPDATE - Unfortunately, play on Day 1 has been called off due to rains. 10.30 AM local time start tomorrow.#WTC21

    — BCCI (@BCCI) June 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपल्या माहिती करीता सांगायचे तर २३ जूनचा दिवस आयसीसीने राखीव दिन म्हणून ठेवला आहे. कोणताही खेळ वाया गेला तर तो २३ जून रोजी खेळला जाईल.

  • Good morning from Southampton. We are just over an hour away from the scheduled start of play but It continues to drizzle here. The match officials are on the field now. ☔ #WTC21 pic.twitter.com/Kl77pJIJLo

भारताने सामन्यासाठी अंतिम इलेव्हनची घोषणा केली आहे, तेथे न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. दोन्ही संघ खालीलप्रमाणे आहेत;

भारत (फायनल इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड (१५-खेळाडू): केन विल्यमसन (कप्तान), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बाउल्ट, डेव्हन कोवेन, कॉलिन डी ग्रँडहॉम्म, मॅट हेन्री, काईल जेमीसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउथी, रॉस टेलर, नील वेगनर , बीजे वॅटलिंग आणि विल यंग.

पंच: रिचर्ड इलिंगवर्थ, मायकेल गफ

Last Updated : Jun 18, 2021, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.