मुंबई : महिला प्रीमियर लीगचा थरार कायम आहे. भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या या लीगमध्ये पाच संघ सहभागी झाले आहेत. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स टीम धमाकेदार खेळी खेळत आहेत. रॉयलची कर्णधार स्मृती मानधना, मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर, दिल्ली कॅपिटल्सची मेग लॅनिंग, यूपी वॉरियर्सची एलिसा हिली आणि गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनी आहेत. मेग, अॅलिसा आणि बेथ या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू आहेत. या तिघांनी नुकत्याच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवले आहे.
-
From us to you - #HappyWomensDay 😊 🫡#TATAWPL pic.twitter.com/MXA2ePsaQe
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">From us to you - #HappyWomensDay 😊 🫡#TATAWPL pic.twitter.com/MXA2ePsaQe
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2023From us to you - #HappyWomensDay 😊 🫡#TATAWPL pic.twitter.com/MXA2ePsaQe
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2023
हे खेळाडू जगभरातील मुलींसाठी आदर्श : स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, मेग लॅनिंग, अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी क्रिकेट जगतात स्वत:चा ठसा उमटवला आहे. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्स, ॲशले गार्डनर, स्नेह राणा, दीप्ती शर्मा या दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात सहभागी होणारे हे खेळाडू जगभरातील मुलींसाठी आदर्श आहेत. मेग लॅनिंग, स्मृती मानधना यांच्यासह दिग्गज महिला क्रिकेटपटूंनी सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हरमनप्रीतची चमकदार कामगिरी : स्मृती मानधना आत्तापर्यंत डब्ल्यूपीएलचे दोन सामने खेळली आहे पण आतापर्यंत ती लयीत दिसलेली नाही. तिने केवळ 58 धावा केल्या आहेत. त्यांच्या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग आणि मुंबईची कर्णधार हरमनप्रीत यांनी दोन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
अंतिम सामना ब्रेब्रॉन स्टेडियमवर होणार : बीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह यांनीही आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डब्ल्यूपीएलचा अंतिम सामना 26 मार्च रोजी ब्रेब्रॉन स्टेडियमवर होणार आहे. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला 6 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्याचवेळी उपविजेत्या संघाला 3 कोटी रुपये आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला 1 कोटी रुपये मिळतील.
हेही वाचा : Ishan Kishan May Debut In Test : इशान किशन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत करू शकतो पदार्पण