नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सिरिजचा लिलाव या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. लिलाव 11 किंवा 13 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. लिलावासाठी जागा अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे नवी दिल्ली किंवा मुंबईत लिलाव होऊ शकतो, असे मानले जात आहे. बीसीसीआयने यापूर्वी ६ फेब्रुवारीला मुंबईत महिला प्रीमियर लीगचा लिलाव आयोजित करण्याची योजना आखली होती. मात्र नंतर निर्णय बदलावा लागला.
पाच फ्रँचायझींना एक महिन्याची मुदत : बीसीसीआयने या लिलावासाठी आयपीएलच्या पाच फ्रँचायझींना एक महिन्याची मुदत दिली होती. महिला आयपीएल 4 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे, ती 24 मार्चपर्यंत चालू शकते. बोर्डाने दोन कारणांमुळे लिलावाच्या तारखा बदलल्याचे सांगण्यात येत आहे. पहिले कारण म्हणजे WPL फ्रँचायझी मालकांकडे संयुक्त अरब अमीरातमध्ये आयएलटि20 (ILT20) आणि दक्षिण आफ्रिकेत एसए20 (SA20) चालू असलेल्या सामन्यांमध्ये खेळणारे संघ देखील आहेत.
4669.99 कोटी रुपये खर्च : आयएलटि20चा अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. एसए20चा अंतिम सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. महिलांच्या आयपीएलमधील पाच संघांपैकी तीन संघ पुरुषांच्या आयपीएलमध्ये आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सचा समावेश आहे. महिला संघ खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींनी एकूण 4669.99 कोटी रुपये खर्च केले आहेत.
अदानी स्पोर्ट्सलाइनने घेतली अहमदाबाद फ्रँचायझी : अदानी समूहाच्या क्रीडा विभाग अदानी स्पोर्ट्सलाइनने अहमदाबाद फ्रँचायझी विकत घेतली आहे. त्याचवेळी नॉन-बँकिंग वित्तीय फर्म कॅप्री ग्लोबलने लखनऊ फ्रँचायझीचे नाव दिले आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्सने फ्रँचायझीसाठी आपापल्या शहरांची निवड केली. सर्व फ्रँचायझींनी बीसीसीआयला ६ फेब्रुवारीनंतर लिलाव करण्यास सांगितले होते.
टी20 विश्वचषकानंतर डब्ल्यूपीएलचे आयोजन : डब्ल्यूपीएल 2023च्या पहिल्या सत्रात 22 सामने खेळले जाऊ शकतात. हे सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील क्रिकेट अकादमीद्वारे आयोजित केले जाऊ शकतात. 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकानंतर डब्ल्यूपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. T20 विश्वचषकाचा अंतिम सामना 26 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर डब्ल्यूपीएल सुरू होईल ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
झुलन गोस्वामी गोलंदाज प्रशिक्षक पदी : डब्ल्यूपीएल 2023 च्या संदर्भात फ्रँचायझी त्यांचे संघ मजबूत करण्यात व्यस्त आहेत. मुंबई फ्रँचायझीने झुलन गोस्वामी यांची संघाची गोलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची अदानी संघ गुजरात जायंट्सची मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटमधील 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर मितालीने गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. त्याच वेळी, भारताची माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी यांची वूमन प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई फ्रँचायझीच्या गोलंदाज प्रशिक्षक पदी म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे झूलन गोस्वामी आता मुंबई टीमच्या खेळाडूंना गोलंदाजीच्या टिप्स देतील.
हेही वाचा : Usman Khawaja granted visa : उस्मान ख्वाजाला भारतात येण्यासाठी व्हिसा मंजूर, चमकदार कामगिरीची अपेक्षा