नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग 2023 चा सीझन-1 शनिवार, 4 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात होणार आहे. डब्ल्यूपीएलचा पहिला सामना मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. याबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. महिला प्रीमियर लीग हे महिला खेळाडूंसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. त्यामुळे लोक आता त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. महिला प्रीमियर लीग सामन्यांची तिकिटे ऑनलाइन कशी बुक करायची आणि या तिकिटांची किंमत काय असेल ते जाणून घ्या.
ऑनलाइन तिकीट विक्री सुरू : बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग 2023 च्या पहिल्या हंगामाचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. आता बोर्डाने महिला प्रीमियर लीग सामन्यांच्या तिकीट विक्रीबाबत अपडेट दिले आहे. या हंगामासाठी ऑफलाइन तिकिटांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या स्पर्धेसाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे. यासाठी तुम्ही बुक माय शो ॲपद्वारे ऑनलाइन तिकीट बुक करू शकता, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. हे ॲप महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रासाठी तिकीट भागीदार बनले आहे. म्हणूनच या ॲपच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही माहिती मिळवू शकता.
तिकिटांची किंमत किती असेल ? : महिला प्रीमियर लीग सामने पाहण्यासाठी तिकीट शुल्क पुरुष प्रेक्षकांसाठी सुमारे 100 किंवा 400 रुपये असू शकते. पण महिलांच्या बाबतीत अगदी उलट आहे. महिला प्रीमियर लीगचा हा पहिला हंगाम आहे. त्यामुळे बीसीसीआयने महिला प्रेक्षकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील कोणत्याही स्टेडियममध्ये महिलांसाठी महिला प्रीमियर लीग सामन्यांची तिकिटे मोफत असतील. याचा अर्थ स्टेडियममध्ये महिला प्रीमियर लीग सामने पाहण्यासाठी महिलांचा प्रवेश विनामूल्य असेल.
महिला प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना : या स्पर्धेत 24 मार्च रोजी एलिमिनेटरसह 22 सामने खेळले जातील, तर महिला प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना 26 मार्च 2023 (रविवार) रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत 24 मार्च रोजी एलिमिनेटरसह 22 सामने खेळले जातील, तर महिला प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना 26 मार्च 2023 (रविवार) रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. एक सामना दुपारी 3.30 वाजल्यापासून तर दुसरा सामना 7.30 वाजेपासून खेळवला जाईल. ही स्पर्धा 23 दिवस चालणार आहे. लीगच्या पहिल्या सत्रात 5 संघ सहभागी होत आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे.