केपटाऊन: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात वनडे मालिका (India v South Africa ODI series) पार पडली आहे. वनडे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र या सामन्यात तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन दीपक चहरने प्रतिस्पर्धी संघावर जोरदार आक्रमण केले. त्याने 34 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी साकारली. तो जोपर्यंत खेळपट्टीवर उभा होता, तो पर्यंत भारतीय संघ विजयी होईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र तो बाद झाल्याने भारतीय संघाला 4 धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याच्या खेळीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले अष्टपैलू दीपक चहरने (All-rounder Deepak Chahar ) आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. त्यामुळे भारतीय संघ त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये अजून धावा करताना पाहू इच्छितो.
-
FIFTY!
— BCCI (@BCCI) January 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A crucial half-century from @deepak_chahar9. Will he turn it into a match winning knock?
Live - https://t.co/dUN5jhH06v #SAvIND pic.twitter.com/YXuR8kUSA0
">FIFTY!
— BCCI (@BCCI) January 23, 2022
A crucial half-century from @deepak_chahar9. Will he turn it into a match winning knock?
Live - https://t.co/dUN5jhH06v #SAvIND pic.twitter.com/YXuR8kUSA0FIFTY!
— BCCI (@BCCI) January 23, 2022
A crucial half-century from @deepak_chahar9. Will he turn it into a match winning knock?
Live - https://t.co/dUN5jhH06v #SAvIND pic.twitter.com/YXuR8kUSA0
राहुल द्रवि़ड म्हणाले, "माझे म्हणने हे आहे की, श्रीलंका दोऱ्यात (India's Sri Lanka tour) त्याने मिळाललेल्या संधीत त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याच्यामध्ये धावा करण्याची क्षमता आहे. तो गोलंदाजीमध्ये सुद्धा किती योगदान देतो हे आपल्याला माहित आहे. मी त्याला भारतीय ए संघात पाहिले आहे. त्यामुळे मला माहित आहे. तो काय करु शकतो. तो चागंली फलंदाजी करतो, त्यामुळे आमच्याकडे अधिक पर्याय उपलब्ध होत आहेत."
राहुल द्रवि़ड एएनआयच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, "ज्यांना आपण गेल्या काही सामन्यांमध्ये बॅटने योगदान देताना पाहिले आहे. त्यामुळे, साहजिकच यासारखे अधिकाधिक खेळाडू जे योगदान देऊ शकतात. त्याचा नक्कीच मोठा फरक पडतो आणि त्यामुळे आम्हाला अधिक पर्याय निर्माण होतात. त्यामुळे, शार्दुल ठाकुर (All-rounder Shardul Thakur) आणि इतर अनेक लोकांसोबत दिपकला आणखी खेळ द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. जे पुढच्या वर्षभरात पुढे जाऊन आम्हाला सखोलता देऊ शकतील. 2023 च्या विश्वचषकच्या योजनांबद्दल विचारले असता द्रविड म्हणाला, "मला वाटते की ही एकदिवसीय मालिका आमच्यासाठी चांगली आहे. मी खूप एकदिवसीय सामने खेळलो नाही, हा माझा एकदिवसीय संघातील पहिला कार्यकाळ आहे. 2019 च्या विश्वचषकानंतर संघानेही अनेक एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. सुदैवाने, २०२३ च्या विश्वचषकापूर्वी जाण्यासाठी आम्हाला वेळ मिळाला आहे. 2023 पर्यंत पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपातील बरेच क्रिकेट होणार आहे."
-
That's that from the final ODI. South Africa win by 4 runs and take the series 3-0.
— BCCI (@BCCI) January 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/dUN5jhH06v #SAvIND pic.twitter.com/lqrMH4g0U9
">That's that from the final ODI. South Africa win by 4 runs and take the series 3-0.
— BCCI (@BCCI) January 23, 2022
Scorecard - https://t.co/dUN5jhH06v #SAvIND pic.twitter.com/lqrMH4g0U9That's that from the final ODI. South Africa win by 4 runs and take the series 3-0.
— BCCI (@BCCI) January 23, 2022
Scorecard - https://t.co/dUN5jhH06v #SAvIND pic.twitter.com/lqrMH4g0U9
"आमच्यासाठी खरोखर आत्मपरिक्षण करण्याची आणि शिकण्याची तसेच अधिक चांगले करण्याची ही एक चांगली संधी असणार आहे. आम्ही अधिक चांगले करु यात शंका नाही. मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करून आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करतो, आम्हाला टेम्पलेट समजते आणि आम्ही त्या टेम्पलेटचा एक मोठा भाग तुमच्या संघाच्या संतुलनावर देखील अवलंबून आहे. याआधी, क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांनी 124 आणि 52 धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 287 धावा केल्या होत्या. भारताकडून प्रसिध कृष्णाने तीन गडी बाद केले."
"तुम्ही प्रामाणिक असाल तर, बाजू संतुलित करू शकणारे काही खेळाडू बाहेर आहेत आणि ते निवडीसाठी येथे उपलब्ध नाहीत. जेव्हा ते परत येतील तेव्हा ते आम्हाला थोडे अधिक खोली देतील. ज्यामुळे आम्हाला एका विशिष्ट शैलीत खेळता येईल. असे म्हटल्यावर, दोनदा प्रथम फलंदाजी करणार्या दक्षिण आफ्रिकेने देखील दोन वेळा केवळ 290 धावा केल्या." द्रविड म्हणाले, "जर मी त्या दोन्ही सामन्यातील 30 षटकांचा आकडा पाहिला, तर आम्ही लक्ष्याचा पाठलाग करायला हवा होता, आम्ही ते केले. आम्ही काही खराब शॉट्स खेळले आणि आम्ही गंभीर परिस्थितीत स्मार्ट क्रिकेट खेळलो नाही. पण या मालिकेतून आम्हाला खूप काही शिकता येईल, विचार करण्यासारखे बरेच काही आहे आणि आम्ही आणखी चांगले होऊ, असे ते पुढे म्हणाले.
हेही वाचा: Ind vs SA, 3rd ODI : दक्षिण आफ्रिकेने भारताला केलं ‘क्लीन स्वीप’, थोडक्यात सामना गमावला