ETV Bharat / sports

World Cup 2023 : 'या' कारणामुळं श्रीलंकेचा प्रशिक्षण सत्र रद्द - World Cup 2023

World Cup 2023: वायू प्रदूषणामुळं श्रीलंकनं संघानं शनिवारी दिल्लीतील होणारं त्यांचं प्रशिक्षण सत्र रद्द केलं आहे. शुक्रवारी, बांगलादेशनं त्यांचं प्रशिक्षण सत्र रद्द केलं होतं. त्यानंतर श्रीलंकनं संघानं प्रशिक्षण सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

World Cup 2023
World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 9:55 PM IST

Updated : Nov 4, 2023, 10:07 PM IST

नवी दिल्ली World Cup 2023 : बांगलादेश क्रिकेट संघापाठोपाठ श्रीलंकेच्या क्रिकेट संघानंही शनिवारी वायू प्रदूषणामुळं राजधानी दिल्लीतील सराव सत्र रद्द केलंय. या आठवड्याच्या सुरुवातीला बांगलादेशचा संघ दिल्लीत आला होता. दिल्ली शहरातील वायू प्रदूषण पातळी गंभीर पातळीवर पोहोचलीय. त्यामुळं बांगलादेशनं शुक्रवारी सराव न करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) सकाळी 407 वर नोंदवला गेला, त्यामुळं श्रीलंकेच्या सराव न करण्याचा निर्णय घेतलाय.

श्रीलंका सांघाचं प्रशिक्षण सत्र रद्द : शनिवारचं प्रशिक्षण सत्र रद्द झाल्याचा संदर्भ देताना श्रीलंका क्रिकेटच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, "हवेच्या समस्येमुळे त्यांचा प्रशिक्षण सराव रद्द करण्यात आला आहे." मात्र, असं असताना देखील बांगलादेशनं सोमवारी खेळाच्या दोन दिवस आधी सराव करण्याचा धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सराव करणार आहेत.

अशी असते हवेची गुणवत्ता : 0-50 "चांगली", 51-100 "समाधानकारक", 101-200 "मध्यम", 201-300 "खराब", 301-400 "अत्यंत खराब"; 401-500. "गंभीर स्वरुपाची हवा" "

हवेच्या गुणत्तेवर बारीक लक्ष : त्यामुळं दिल्लीबाहेर सामना आयोजित करण्याचा कोणताही विचार सध्या आयसीसी करत नाहीय. परंतु सामना होणार की नाही याचा निर्णय त्याच दिवशी घेतला जाईल. आयसीसीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "आम्ही सध्या परिस्थितीचं आकलन करत आहोत. आयसीसी, बीसीसीआय यावर विचार करत आहे. दिल्लीतील हवेच्या सध्या हवेच्या गुणवत्तेवर आयसीसी, बीसीसीआयचं लक्ष आहे. हवेच्या गुणवत्तेचं मूल्यांकन करून सामना होणार का नाही याचा निर्णय घेतला जाईल असं आयसीसीच्या प्रवक्त्यांनं सांगितलंय.

वायू प्रदूषणाचा सामना : श्रीलंकेला दिल्लीच्या वायू प्रदूषणाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. याआधी 2017 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान खेळाडूंना मास्क घालावं लागलं होतं. काही खेळाडूंना सामन्यादरम्यान उलट्याही झाल्या होत्या. शुक्रवारी बांगलादेश संघाचे संचालक खालिद महमूद यांनी सांगितलं, की अनेक खेळाडूंना खोकल्याचा त्रास होत आहे.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : हार्दिकच्या दुखापतीमुळे 'या' खेळाडूची लॉटरी, बनला टीम इंडियाचा उपकर्णधार
  2. Mohammed Shami : वडीलच होते पहिले प्रशिक्षक, शेतामध्ये शिकला स्विंग बॉलिंग; जाणून घ्या शमीचा आतापर्यंतचा प्रवास
  3. Cricket World Cup 2023 : दुखापतग्रस्त हार्दिकला विश्वचषकातून निरोप; हा 'प्रसिद्ध' खेळाडू घेणार जागा

Last Updated : Nov 4, 2023, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.