ETV Bharat / sports

World Cup २०२३ : व्हिडिओ पुरावा नसलेला ऐतिहासिक सामना; कपिल देवनं ठोकल्या होत्या 175 धावा

World Cup २०२३ : ICC क्रिकेट विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 1983 मध्ये भारतानं अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यावेळेसचा कर्णधार कपिल देव यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या विश्वचषकात कपिल देव यांनी नाबाद १७५ धावा ठोकल्या होत्या. 'ईटीव्ही भारत'चे प्रदीप सिंग रावत यांनी या ऐतिहासिक खेळीच्या आठवणी सांगितल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 9:22 PM IST

हैदराबाद : World Cup २०२३ : भारतानं 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता. त्या आठवणी आजही देशवासीयांच्या स्मरणात आहेत. त्या विश्वचषकामध्ये कपिल देव यांनी नाबाद १७५ धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी भारतानं वेस्ट इंडिजच्या वर्चस्वालाच आव्हान दिलं नाही तर विश्वचषक विजयाची हॅट्ट्रिक करण्याचं त्यांचं स्वप्नही भंगलं. कपिल देव यांनी तुनब्रिज वेल्स येथे खेळलेली खेळी ही इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. त्या सामन्याचा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाही.

भारत आणि झिम्बाब्वेत सामना : 1983 मध्ये कपिल देव (Kapil Dev) यांनी विक्रम रचला होता. 1983 चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये (1983 Cricket World Cup) खेळला जात होता. एकदिवसीय क्रिकेटमधील हा तिसरा विश्वचषक (World Cup 1983) होता. भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये समोरासमोर होते. त्या काळी झिम्बाब्वेचं आव्हान होतं. पण, या सामन्यात कपिल देव (Kapil Dev) यांनी झिम्बाबेच्या गोलंदाजांना लोळंवलं होतं. या सामन्यातच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देव यांनी 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. हा दिवस क्रिकेट चाहते आणि भारतीयांच्या हृदयावर कोरला गेलाय.

138 चेंडूत 175 धावांची ऐतिहासिक खेळी : कपिल देव यांनी 39 वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 चेंडूत 175 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली होती. या दिवशी एकदिवसीय सामन्यात 100 धावा करणारे कपिल देव पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले होते. ही त्याकाळी वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी होती. त्यानंतरही दीर्घकाळ एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी करण्याचा हा विक्रम कपिल देव यांच्याच नावावर होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी : विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव करून भारतानं दमदार सुरुवात केली होती. 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. वेस्ट इंडिजसारख्या दिग्गज संघाला पहिल्याच सामन्यात पराभूत केल्यानंतर भारताची जिंकण्याची शक्यता वाढली होती. भारतानं ग्रुप स्टेजमधील 3 पैकी 2 सामने जिंकले होते. चौथ्या सामन्यात भारताला झिम्बाब्वेला सामोरे जावं लागणार होतं. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

कपिल देव यांची एकाकी झुंज : या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर मोहिंदर अमरनाथ (5), संदीप पाटील (1) आणि यशपाल शर्मा (9) यांनाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. अवघ्या 17 धावांपर्यंत मजल मारताना भारतीय संघानं पाच फलंदाज गमावले होते. झिम्बाब्वेच्या केविन कुरन आणि पीटर रॉसन यांनी भारतीय फलंदाजांच्या दांड्या उडवल्या होत्या. भारतानं 50 धावांपर्यंतही पोहोचू शकणार नाही असे वाटत होतं. यानंतर कर्णधार कपिल देव यांनी एकाकी झुंज देत या कठीण परिस्थितीत वेगवान फलंदाजी सुरू केली.

सामना भारतानं जिंकला : कपिल देव यांनी चांगली फलंदाजी सुरू केली. यात रॉजर बिन्नी यानंही देव यांना चांगली साथ दिली. त्यानंतर 48 चेंडूत 22 धावा करून बिन्नी आऊट झाला. त्यानंतर मदन लाल (17) आणि सय्यद किरमाणी (24) यांनी कपिल यांना जास्ती चेंडू खेळण्याची संधी दिली. कपिल देव यांनी स्फोटक फलंदाजी करत 138 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. कपिल देव यांनी या खेळीत 16 चौकार आणि 6 षटकार मारले. कपिल यांच्या खेळीमुळं भारतीय संघानं 60 षटकात 8 गडी गमावून 266 धावा केल्या होत्या. 267 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 235 धावांवर गारद झाला. भारतानं झिम्बाब्वे विरुद्धचा हा सामना 31 धावांनी जिंकला.

सामन्याचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत : कपिल देव यांनी केलेली तुफान खेळी आजही क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे. तेव्हापासूनच कपिल देव यांना 'हरियाणा हरिकेन' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी प्रेक्षक आणि खेळाडू यांनी प्रत्यक्षात मैदानात वादळ पाहिलं होतं. कपिल देव यांनी 16 चौकार आणि सहा षटकार लगावले होते. भारतानं झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव केला आणि कपिल देव यांना शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. या सामन्यात कपिल यांनी एक विकेट घेत 11 षटकात 32 धावा दिल्या होत्या. दरम्यान, 20 मार्च 1983 रोजी बीबीसीचा संप झाला होता आणि या सामन्याचे थेट प्रक्षेपण होऊ शकले नाही.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : 'हे' ५ सर्वात अनुभवी खेळाडू विश्वचषकात दाखवू शकतात दमदार कामगिरी
  2. Cricket World Cup 2023 : यावर्षी तरी न्यूझीलंड विश्वचषक जिंकणार का? 'या' पाच खेळाडूंवर असेल विजय मिळवून देण्याची जबाबदारी
  3. Cricket World Cup २०२३ : ऑटोचालकाचा मुलगा ते वेगवान गोलंदाज, मोहम्मद सिराजचा युवकांसमोर आदर्श

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.