मुंबई World Cup 2023 : भारत आणि न्यूझिलंड संघात 15 नोव्हेंबरला क्रिकेट विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामना होणार आहे. चार वर्षापूर्वी या दोन्ही संघात उपांतपूर्व सामना झाला होता. तेव्हा पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला होता. यावेळी न्यूझीलंड आणि भारतीय संघात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात न्यूझीलंड संघानं भारताचा पराभव केला होता. या सामन्यावेळी ऑस्ट्रेलियाचे रॉड टकर आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे पंच म्हणून होते. हीच दुकली उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात राहणार आहे.
भारत आणि न्यूझिलंड संघात उपांत्यपूर्व सामना : ऑस्ट्रेलियन पंच रॉड टकर आणि इंग्लंडचे पंच रिचर्ड इलिंगवर्थ हे भारत आणि 2019 चे उपविजेता असलेल्या न्यूझीलंड या संघात पंच म्हणून राहणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणाऱ्या या लढतीसाठी भारतीय संघाचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे. चार वर्षांपूर्वी उपांत्यपूर्व सामन्यात ओल्ड ट्रॅफर्ड इथं न्यूझीलंडनं 18 धावांनी भारतावर विजय मिळवला होता. या सामन्यात इलिंगवर्थ हे मैदानावरील पंच होते, तर रॉड टकर हे तिसरे पंच होते.
भारताचे नितीन मेनन करणार पंच म्हणून करिअरची सुरुवात : रॉड टकर यांनी जानेवारी 2009 मध्ये आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. यावेळी तिसरे पंच जोएल विल्सन, चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट हे ऐतिहासिक सामन्यासाठी सहभागी होणार आहेत. रिचर्ड केटलबरोनं 21 ऑक्टोबरला नेदरलँड्स श्रीलंका सामन्यात वेगळा विक्रम केला आहे. आता केटलबरो सलग तिसऱ्या विश्वचषकात 'पंचगिरी' करणार आहेत. तर भारताचे नितीन मेनन पहिल्या विश्वचषकात अंपायरिंग करणार आहेत. ख्रिस गॅफनी तिसरे पंच म्हणून काम करतील. मायकेल गॉफ (चौथे पंच) आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ (मॅच रेफरी) म्हणून भूमीका निभावणार आहेत.
आयसीसीनं केलं अभिनंदन : आयसीसीचे पंच व्यवस्थापक सीन इझी यांनी सामना अधिकाऱ्यांचं त्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केलं. "विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. कार्यकारी संघानं या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, बाद फेरीत सहभागी झालेल्या संघाना शुभेच्छा देतो" असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
उपांत्य फेरीसाठी सामना अधिकारी :
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, बुधवार, 15 नोव्हेंबर, मुंबई
- मैदानी पंच : रिचर्ड इलिंगवर्थ आणि रॉड टकर
- थर्ड अंपायर : जोएल विल्सन
- चौथे अंपायर : एड्रियन होल्डस्टॉक
- सामनाधिकारी : अँडी पायक्रॉफ्ट
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, गुरुवार, 16 नोव्हेंबर, कोलकाता
- मैदानी पंच : रिचर्ड केटलबरो आणि नितीन मेनन
- थर्ड अंपायर: ख्रिस गॅफनी
- चौथे अंपायर: मायकेल गफ
- सामनाधिकारी: जवागल श्रीनाथ
हेही वाचा :