धर्मशाला (हिमाचल प्रदेश) World Cup 2023 IND vs NZ : भारत-न्यूझीलंड यांच्यात रविवारी धर्मशाला स्टेडियमवर सामना होणार आहे. या धमाकेदार सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात रोहित शर्माच्या संघाला 2019 च्या सामन्याचा बदला घेण्याची संधी आहे. 20 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत 2003 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतानं न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता. यानंतर 2007, 2011, 2015 च्या विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये एकही सामना झाला नाही. 2019 मध्ये, न्यूझीलंडनं ट्रेंट ब्रिज मैदानावर सेमीफायनलमध्ये भारताचा 18 धावांनी पराभव केला होता. त्यामुळं भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं.
न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा 5-3 ने पुढं : भारत-न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. सर्व सामने जिंकल्यानंतर दोन्ही संघ 8 गुणांसह पहिल्या तसंच 2 व्या क्रमांकावर आहेत. भारतीय संघ धावसंख्येत न्यूझीलंडच्या मागे असून दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा 5-3 ने पुढे आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकलाय. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ या सामन्यात उतरणार आहे. हार्दिक संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. भारताला हार्दिक पांड्याची उणीव जाणवणार आहे. तसंच न्यूझीलंडला कर्णधार केन विल्यमसनची उणीव भासणार आहे. केन विल्यमस अंगठ्याच्या फ्रॅक्चरमुळे संध्या संघाबाहेर आहे.
नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार : हार्दिक पांड्या भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आहे. धर्मशालाचं मैदान वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. अशा स्थितीत हार्दिक विरोधी संघाला नमवू शकला असता. हार्दिकच्या ऐवजी आता रोहितला मोहम्मद शमी, सूर्य कुमार यादव यांच्यापैकी एकाची निवड करणं कठीण होणार आहे. धर्मशाळा हे पर्वतांसाठी ओळखलं जातं. येथील पर्वत बर्फाने झाकलेले आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्या डावात धर्मशाळेत दव पडण्याची शक्यता आहे. इथं पडणारं दव भारतासाठी धोकादायक ठरू शकतं. अशा स्थितीत नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. धर्मशालामध्ये पडणाऱ्या दव बाबत न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनं आदल्या दिवशी सांगितलं होतं, 'धर्मशालामध्ये दव पडल्यानं सामन्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. काल सायंकाळी पाच वाजता येथे काही प्रमाणात दव पडण्यास सुरुवात झाली. वातावरण पाहून गोलंदाजी किंवा फलंदाजीचा निर्णय घेऊ, असं म्हटलं होतं.
त्रिकुट करणार न्यूझीलंडवर मात : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यांच्याशिवाय विराट कोहली, केएल राहुलही शानदार फलंदाजी करत आहेत. रोहित शर्माला शुभमन गिलच्या रूपानं मजबूत सलामीवीर मिळाला आहे. अशा स्थितीत तो आक्रमक फलंदाजी करण्यास सक्षम आहे. विराट कोहलीनं दमदार फलंदाजी करताना धावा केल्या आहेत. केएल राहुलनेही त्याची खेळी दाखवली आहे. या तिघांचं त्रिकुट न्यूझीलंडवर मात करू शकतं.
भारताकडं चांगली गोलंदाजी : भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांच्याकडून खूप अपेक्षा असतील. धर्मशालाची खेळपट्टीवर चेंडू स्विंग होतो. अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजाना गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्याची पूर्ण संधी असेल. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत केएल राहुल, रवींद्र जडेजासारखे चांगले क्षेत्ररक्षक आहेत.
हेही वाचा -
- ICC World CUP 2023 : विश्वचषकात भारतीय संघाची अप्रतिम कामगिरी, विरोधकाला पराभूत करण्याची न्यूझीलंड संघात ताकद
- World Cup २०२३ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात कोण मारणार बाजी?
- World Cup 2023 AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पाडला धावांचा पाऊस, पाकिस्तानी गोलंदाज 'धुतल्यानं' 'हे' विक्रमही गेले वाहून