ETV Bharat / sports

Womens T20 Challenge VEL vs TRL : नाणेफेक जिंकून व्हेलॉसिटीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; ट्रेलब्लेझर्स फलंदाजीसाठी सज्ज - cricket news

व्हेलॉसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स ( VEL vs TRL ) संघात महिला टी-20 चॅलेंज 2022 चा तिसरा सामना खेळला जाणार आहे. व्हेलॉसिटी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना संध्याकाळी ठीक साडेसातला सुरु होणार आहे.

VEL vs TRL
VEL vs TRL
author img

By

Published : May 26, 2022, 7:23 PM IST

पुणे: महिला टी-20 चॅलेंज 2022 ( Womens T20 Challenge 2022 ) मधील तिसरा सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना व्हेलॉसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स ( Velocity vs Trailblazers ) संघात खेळला जाईल. या सामन्याची नाणेफेक दोन्ही संघाचे कर्णधार दीप्ती शर्मा आणि स्मृती मंधाना यांच्यात पार पडली आहे. व्हेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना संध्याकाळी ठीक साडेसातला सुरु होणार आहे.

ट्रेलब्लेझर्स संघाला या आधी आपला पहिला सामना सुपरनोव्हाज संघाविरुद्ध खेळला होता. ज्या सामन्यात ट्रेलब्लेझर्स संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर व्हेलॉसिटी संघाने आपल्या पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाज संघाला पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे आजचा हा सामना दोन्ही संघाचा दुसरा सामना आहे. ट्रेलब्लेझर्स संघाला आजच्या सामन्यात आपल्या पहिल्या विजयाची नोंद करण्याची अपेक्षा असणार आहे.

ट्रेलब्लेझर्स (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जेमिमा रॉड्रिग्स, सोफिया डंकले, सभिनेनी मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, सलमा खातून, पूनम यादव, रेणुका सिंग आणि राजेश्वरी गायकवाड.

व्हेलॉसिटी (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, नत्थकन चँथम, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण नवगिरे, स्नेह राणा, राधा यादव, केट क्रॉस, अयाबोंगा खाका आणि सिमरन बहादूर.

हेही वाचा - Rajat Patidar Story : अनसोल्ड राहण्यापासून ते सामनावीर बनण्यापर्यंत रजतची 'अशी' आहे कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.