ETV Bharat / sports

Womens T20 Challenge 2022 : महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हा आमने सामने

आज पासून महिला टी-20 चॅलेंज ( Womens T20 Challenge ) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हा संघात खेळला जाणार आहे.

Trailblazers vs Supernovas
Trailblazers vs Supernovas
author img

By

Published : May 23, 2022, 6:00 PM IST

पुणे: आयपीएल 2022 चे साखळी सामने रविवारी संपल्यानंतर सोमवार (23 मे) पासून महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हा ( Trailblazers vs Supernovas ) यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसातला पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडियमवर सुरु होईल. स्मृती मंधानाच्या ( Smriti Mandhana ) खांद्यावर ट्रेलब्लेझर्सची तर सुपरनोव्हा संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या ( Harmanpreet Kaur ) खांद्यावर असणार आहे.

2020 मध्ये, सुपरनोव्हास अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सकडून पराभूत झाले. त्याचा बदला आज घेण्याचा हेतू सुपरनोव्हाचा असेल. कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा झाली नव्हती. यावर्षी पुन्हा त्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लीगमधील तिसरा संघ वेलोसिटी आहे. ट्रेलब्लेझर्समध्ये मंधाना व्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष सारख्या खेळाडू आहेत जे फलंदाजी मजबूत करतील. त्याचबरोबर गोलंदाजीत पूनम यादव राजेश्वरी गायकवाड या नावांचा समावेश आहे. संघ संतुलित दिसत आहे.

दुसरीकडे, सुपरनोव्हाच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार हरमनप्रीत कौरवर ( Captain Harmanpreet Kaur ) असेल. तिच्याशिवाय तानिया भाटिया आणि प्रिया पुनिया याही फलंदाजीसाठी ओळखल्या जातात. गोलंदाजीत या संघात मानसी जोशी आणि मेघना सिंग अशी नावे आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. त्याचबरोबर हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर थेट पाहता येईल.

ट्रेलब्लेझर्स स्क्वॉड: स्मृती मानधना (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, सभिनेनी मेघना, शर्मीन अख्तर, रिचा घोष (यष्टीरक्षक), हेली मॅथ्यूज, सोफिया डंकले, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सलमा खातून, रेणुका सिंग, अरुंधती रेड्डी प्रियंका प्रियंदर्शनी, सायका इशाक, रेणुका सिंग, श्रद्धा भाऊ पोखरकर आणि सुजाता मल्लिक.

सुपरनोव्हास स्क्वॉड: हरमनप्रीत कौर (कर्णधार), मुस्कान मलिक, प्रिया पुनिया, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, पूजा वस्त्राकर, सुने लुस, सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, आयुषी सोनी, मानसी जोशी, मेघना सिंग, मोनिका पटेल , व्ही चंदू आणि राशी कनोजिया

हेही वाचा - Indian T20 Squad : उमरान मलिकची टीम इंडियात निवड झाल्याने जम्मूमध्ये जल्लोष, उपराज्यपालांनी केले अभिनंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.