मुंबई : भारताच्या धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि युवा खेळाडू शेफाली वर्मा यांच्या नावांना सोमवारी होणाऱ्या पहिल्या महिला प्रीमियर लीग (WPL) लिलावात मोठी बोली लागण्याची अपेक्षा आहे. परदेशी खेळाडूंमध्ये अॅलिसा हिली, बेथ मूनी, एलिस पेरी, नॅट सायव्हर, मेगन शुट आणि डिआंड्रा डॉटिन ही काही नावे आहेत ज्यांना मोठ्या बोली लागतील. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स हे पाच संघ 409 खेळाडूंच्या यादीतून 90 खेळाडूंसाठी बोली लावणार आहेत.
-
Mumbai 📍 gearing up for the #WPLAuction 🔨
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
LET'S DO THIS 💪 pic.twitter.com/ISfKwlGiYj
">Mumbai 📍 gearing up for the #WPLAuction 🔨
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023
LET'S DO THIS 💪 pic.twitter.com/ISfKwlGiYjMumbai 📍 gearing up for the #WPLAuction 🔨
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023
LET'S DO THIS 💪 pic.twitter.com/ISfKwlGiYj
प्रत्येक संघाकडे 12 कोटी रुपये : पहिल्या वर्षातील लिलावासाठी प्रत्येक संघाकडे 12 कोटी रुपये उपलब्ध असतील. तर 18 खेळाडूंच्या संघात सहा परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. यासह 60 भारतीयांपैकी किमान 20 ते 25 खेळाडू लिलावात चांगल्या किमतीत विकले जाण्याची अपेक्षा आहे. खेळाडूची सर्वात कमी बेस प्राइज 10 लाख रुपये तर सर्वात जास्त बेस प्राइज 50 लाख रुपये आहे. इतर बेस प्राईज 20, 30 आणि 40 लाख रुपये असेल. भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना लिलावात जास्त मागणी असेल अशी अपेक्षा आहे. फ्रँचायझीशी संबंधित काही अधिकार्यांच्या मते स्मृती, शेफाली, हरमनप्रीत आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना 1.25 कोटी ते 2 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
-
CAN. NOT. WAIT ⏳
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Just 1️⃣ Day away from the inaugural #WPLAuction 🙌 pic.twitter.com/dNQjIuhhc3
">CAN. NOT. WAIT ⏳
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023
Just 1️⃣ Day away from the inaugural #WPLAuction 🙌 pic.twitter.com/dNQjIuhhc3CAN. NOT. WAIT ⏳
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023
Just 1️⃣ Day away from the inaugural #WPLAuction 🙌 pic.twitter.com/dNQjIuhhc3
या खेळाडूंवर नजर : बिग हिटर ऋचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांच्यावर देखील मोठी बोली लागण्याची अपेक्षा आहे. राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादवसारख्या फिरकीपटू आणि मेघना सिंग आणि शिखा पांडेसारख्या वेगवान गोलंदाजांनाही चांगली किंमत मिळू शकते. परदेशी टी-20 लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सलाही लिलावात चांगली रक्कम मिळू शकते. अनकॅप्ड भारतीय खेळाडूंच्या श्रेणीत काश्मीरची जसिया अख्तर आणि रेल्वेची स्वागतिका रथ ही प्रमुख नावे आहेत. 18 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या महिला संघातील फलंदाज श्वेता सेहरावत, फिरकीपटू पार्श्वी चोप्रा, मन्नत कश्यप आणि अर्चना देवी, वेगवान गोलंदाज तितास साधूसह यांनाही चांगली रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे.
-
Auction Briefing ✅
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Over to the Big Day tomorrow ⌛️#WPLAuction pic.twitter.com/g5MLic83mc
">Auction Briefing ✅
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023
Over to the Big Day tomorrow ⌛️#WPLAuction pic.twitter.com/g5MLic83mcAuction Briefing ✅
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 12, 2023
Over to the Big Day tomorrow ⌛️#WPLAuction pic.twitter.com/g5MLic83mc
किमान नऊ कोटी रुपये खर्च करावे लागतील : सर्व पाच फ्रँचायझी सर्वोत्तम कर्णधार मिळविण्याचा प्रयत्न करतील ज्यात स्मृती आणि हरमनप्रीत व्यतिरिक्त, अनुभवी खेळाडू मेग लॅनिंग, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट आणि न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन यांचा समावेश आहे. लिलावत खेळाडूंना खरेदी करण्यासाठी किमान नऊ कोटी रुपये खर्च करावे लागतील, तर संघातील अनिवार्य सदस्यांची संख्या 15 आणि जास्तीत जास्त खेळाडूंची संख्या 18 आहे. संघात जास्तीत जास्त 12 भारतीय आणि 6 विदेशी खेळाडू असू शकतात. या लिलावात 246 भारतीय आणि 155 विदेशी खेळाडूंचा समावेश असेल.
हेही वाचा : Women T20 World Cup : 'या' खेळाडूंनी घेतल्या आहेत प्रत्येक आवृत्तीत सर्वाधिक विकेट्स