ग्रेनेडा - वेस्ट इंडिज संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाचे उट्टे पहिल्या टी-२० सामन्यात काढले. वेस्ट इंडिजने आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना ८ गडी आणि ३० चेंडू राखून जिंकला. विंडीजच्या या विजयात एविन लुईस याने ७१ धावांची ताबडतोड खेळी केली.
ग्रेनेडाच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा आफ्रिकीने निर्धारित २० षटकात ६ बाद १६० धावा केल्या. यात रासी वान डर डुसेन याने नाबाद ५६ धावांचे योगदान दिले. डुसेन व्यतिरिक्त आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडीजकडून ड्वेन ब्राव्हो आणि फॅबियन एलेन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर जेसन होल्डर आणि आंद्रे रसेल यांना १-१ गडी बाद करता आला.
-
What a way to bring up a T20I half century! Definitely our #MastercardPricelessMoment. #WIvSA pic.twitter.com/Dv581TKGYw
— Windies Cricket (@windiescricket) June 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What a way to bring up a T20I half century! Definitely our #MastercardPricelessMoment. #WIvSA pic.twitter.com/Dv581TKGYw
— Windies Cricket (@windiescricket) June 26, 2021What a way to bring up a T20I half century! Definitely our #MastercardPricelessMoment. #WIvSA pic.twitter.com/Dv581TKGYw
— Windies Cricket (@windiescricket) June 26, 2021
आफ्रिकेने विजयासाठी दिलेले १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एविन लुईस आणि आंद्रे फ्लेचर या जोडीने ७ षटकात ८५ धावांची सलामी दिली. फ्लेचर धावबाद झाल्यानंतर ख्रिस गेल आणि लुईस या जोडीने संघाला विजयासमीप नेले. शम्सीने लुईसला मिलरकडे झेल देण्यास भाग पाडलं. लुईसने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह ७१ धावांची खेळ केली. लुईस बाद झाल्यानंतर गेल (३२) आणि आंद्रे रसेल (२३) या जोडीने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, उभय संघात पाच सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना जिंकत विंडीजने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
विंडीजच्या फलंदाजांनी ठोकले १५ षटकार -
वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी या सामन्यात एकूण १५ षटकार मारले. यात सर्वाधिक ७ षटकार लुईसने खेचले. तर गेल आणि रसेल यांनी प्रत्येकी ३-३ षटकार ठोकले. तर फ्लेचरने दोन वेळा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला.
हेही वाचा - Ind W Vs Eng W : भारतीय संघाचा खास सराव, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - विराट कोहलीचा 'चमचा' म्हटल्यावर भडकला इरफान पठाण, पलटून विचारला जबराट प्रश्न