ETV Bharat / sports

WI vs IND 3rd ODI : विंडीजशी आज तिसरा वनडे सामना; भारताचा क्लीन स्वीपचा निर्धार

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील ( Captain Shikhar Dhawan ) टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील ( WI vs IND ODI Series ) पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसाठी दोन्ही संघ आता बुधवारी (27 जुलै) आमनेसामने असतील. जिथे एकीकडे भारतीय संघाला हा सामना जिंकून क्लीन स्वीप करायला आवडेल. त्याचबरोबर पाहुणा संघ शेवटचा सामना जिंकून सन्मान वाचवेल.

WI vs IND 3rd ODI
WI vs IND 3rd ODI
author img

By

Published : Jul 27, 2022, 12:58 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन: बुधवारी पोर्ट ऑफ स्पेन येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तीन सामन्यांच्या वनडे ( WI vs IND 3rd ODI ) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने अगोदरच 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून भारत धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने मैदानात ( India determination for a clean sweep ) उतरेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न राहिल.

रुतुराज गायकवाडला फलंदाजीत शुभमन गिलपेक्षा ( Batsman Shubman Gill ) प्राधान्य मिळण्याची शक्यता नाही. गिलने गेल्या दोन सामन्यात ६४ आणि ४३ धावांच्या दोन उपयुक्त खेळी खेळल्या. गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत खेळण्याची संधी मिळाली, जिथे तो वेगवान गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनीही मागील सामन्यात अर्धशतके झळकावली होती, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतरही सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी दिली जाऊ शकते.

जडेजा तिसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध होईल की नाही हेही निश्चित नाही. कारण त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलने ( All-rounder Axar Patel ) दुसऱ्या सामन्यात 64 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला. पटेलच्या या कामगिरीकडे संघ व्यवस्थापन दुर्लक्ष करू शकत नाही. धवनने दोन डावखुऱ्या फिरकीपटूंना मैदानात उतरवण्याचा विचार केला तर युझवेंद्र चहलला बाहेर बसावे लागू शकते. पण यामुळे भारतीय गोलंदाजीत वैविध्याचा अभाव निर्माण होऊ शकतो.

वेस्ट इंडिजचा विचार करता, त्यांच्याकडे क्षमता आहे, परंतु ते त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात ते अपयशी ठरले आहेत. ते आतापर्यंत शाई होप, निकोलस पूरन ( Captain Nicholas Pooran ), रोव्हमन पॉवेल किंवा रोमेरिओ शेफर्डवर अवलंबून आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाने आतापर्यंत महत्त्वाच्या प्रसंगी चांगली कामगिरी केलेली नाही. मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिज जेसन होल्डरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतो. याआधी बांगलादेशकडून 0-3 असा पराभव पत्करलेल्या वेस्ट इंडिजचे वनडेतील पराभवाची मालिका खंडित करण्याचे लक्ष्य असेल.

दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत -

वेस्ट इंडिज: निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शामर ब्रूक्स, कीसे कार्टी, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जेडेन सील्स आणि हेडन वॉल्श.

भारत: शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : गोंधळानंतर लोव्हलिना बोरगोहेनच्या प्रशिक्षक संध्या गुरुंगला मिळाली मान्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.