मुंबई: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फिनिशर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत ( CSK captain Mahendra Singh Dhoni ) आला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यादरम्यान फलंदाजीला येण्यापूर्वी धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी आपली बॅट चावताना ( Dhoni biting his bat ) दिसत आहे. धोनी फलंदाजीपूर्वी असे का करतो, याचा खुलासा एका भारतीय खेळाडूने केला आहे.
धोनी फलंदाजीपूर्वी असे का करतो याचा खुलासा भारताचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने ( Revealed by Amit Mishra ) केला आहे. मिश्राने सांगितले की, धोनी आपली बॅट स्वच्छ ठेवण्यासाठी असे करतो. त्याने ट्विट करून लिहिले, जर तुम्ही विचार करत असाल की धोनी अनेकदा त्याची बॅट का चावतो. त्याला बॅट स्वच्छ ठेवायला आवडते म्हणून तो बॅटमधून टेप काढण्यासाठी असे करतो. तुम्ही एमएसच्या बॅटमधून एकही टेप किंवा धागा निघताना पाहिला नसेल.
-
In case you’re wondering why Dhoni often ‘eats’ his bat. He does that to remove tape of the bat as he likes his bat to be clean. You won’t see a single piece of tape or thread coming out of MS’s bat. #CSKvDC #TATAIPL2022
— Amit Mishra (@MishiAmit) May 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In case you’re wondering why Dhoni often ‘eats’ his bat. He does that to remove tape of the bat as he likes his bat to be clean. You won’t see a single piece of tape or thread coming out of MS’s bat. #CSKvDC #TATAIPL2022
— Amit Mishra (@MishiAmit) May 8, 2022In case you’re wondering why Dhoni often ‘eats’ his bat. He does that to remove tape of the bat as he likes his bat to be clean. You won’t see a single piece of tape or thread coming out of MS’s bat. #CSKvDC #TATAIPL2022
— Amit Mishra (@MishiAmit) May 8, 2022
धोनी 41 वर्षांचा होणार आहे, पण त्याच्याकडे पाहता वय त्याच्यासाठी फक्त एक आकडा असल्याचे दिसते. चेन्नई संघाची कमान पुन्हा स्वीकारल्यानंतर धोनी पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. आयपीएल 2022 च्या 55व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याच्या शानदार फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला. या सामन्यात त्याने अवघ्या 8 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 21 धावांची नाबाद खेळी खेळली.
हेही वाचा - IPL 2022 Playoffs : सीएसकेला प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 'असे' आहे समीकरण