हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies) यांच्यातील वनडे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून (रविवार) होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच हा सामना भारतीय संघाचा 1000 वा एकदिवसीय सामना आहे.
भारतीय संघ 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा जगातील पहिला देश आहे. तसेच केवळ ऑस्ट्रेलिया (958) आणि पाकिस्तान (936) यांनी आतापर्यंत 900 चा टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघाने आपला पहिला वनडे 48 वर्षांपूर्वी 1974 मध्ये लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. मात्र, त्यात त्यांचा चार गडी राखून पराभव झाला होता.
-
#TeamIndia first played an ODI in 1974 & today we've reached a momentous occasion of 1000th ODI.👏👏
— BCCI (@BCCI) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Captain @ImRo45, @imVkohli & Head Coach Rahul Dravid share their thoughts on the landmark. 👍- By @Moulinparikh
Watch the special feature 🎥 🔽 #INDvWIhttps://t.co/Gb7gN9xrOP pic.twitter.com/d4lkvJ5EHb
">#TeamIndia first played an ODI in 1974 & today we've reached a momentous occasion of 1000th ODI.👏👏
— BCCI (@BCCI) February 6, 2022
Captain @ImRo45, @imVkohli & Head Coach Rahul Dravid share their thoughts on the landmark. 👍- By @Moulinparikh
Watch the special feature 🎥 🔽 #INDvWIhttps://t.co/Gb7gN9xrOP pic.twitter.com/d4lkvJ5EHb#TeamIndia first played an ODI in 1974 & today we've reached a momentous occasion of 1000th ODI.👏👏
— BCCI (@BCCI) February 6, 2022
Captain @ImRo45, @imVkohli & Head Coach Rahul Dravid share their thoughts on the landmark. 👍- By @Moulinparikh
Watch the special feature 🎥 🔽 #INDvWIhttps://t.co/Gb7gN9xrOP pic.twitter.com/d4lkvJ5EHb
भारतीय संघ या ऐतिहासिक सामन्याचा साक्षीदार बनण्यासाठी सज्ज आहे. परंतु या सामन्यासाठी प्रेक्षकांची मैदानावर उपस्थिती नसणार आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या परिणामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका (Three-match T20 series in Kolkata) खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षकांच्या 75 टक्के उपस्थिला परवानगी देण्यात आली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi at the stadium) दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रेक्षेपण टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports 1, Star Sports 1 HD, Star Sports 1 Hindi, Star Sports 1 Hindi HD) वर पाहता येणार आहे. त्याचबरोबर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर देखील पाहता येणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ (Indian team for ODI series) -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप -कर्णधार), मयंक अग्रवाल, रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), शाहरुख खान, दीपक हुड्डा, ऋषभ पतं (यष्टीरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ (West Indies for ODI series) -
कीरोन पोलार्ड (कर्णधार), फैबियन एलेन, एनक्रुमाह बोनर, डेरेन ब्रावो, शामार ब्रुक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, अलजारी जोसफ, ब्रैंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेपर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वाल्श जूनियर.