अहमदाबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies) संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज (बुधवार) खेळला जात आहे. वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिकंन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघात आज एक बदल करण्यात आला आहे. उपकर्णधार केएल राहुल (Vice-captain KL Rahul) प्लेयंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याला ईशान किशनच्या जागी स्थान देण्यात आले आहे. तसेच वेस्ट इंडिज संघाचा नियमित कर्णधार किरोन पोलार्ड दुखापतीमुळे (Captain Kieron Pollard injured) आजचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी वेस्ट इंडिज संघाची धुरा निकोलस पूरनच्या (West Indies led by Nicholas Pooran) खांद्यावर आहे.
प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाला पहिला धक्का रोहित शर्माच्या रुपाने बसला. कर्णधार रोहित शर्मा (5) (Captain Rohit Sharma out ) संघाची धावसंख्या 9 असताना बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाला दुसरा धक्का रिषभ पंतच्या (18) रुपाने बसला. तसेच विराट कोहली देखील बाराव्या षटकात 18 धावा काढून बाद झाला. त्यामुळे 15 षटकांनतर भारतीय संघाची धावसंख्या 3 बाद 47 अशी झाली आहे.
वेस्ट इंडिज संघाकडून गोलंदाजी करताना ओडियन स्मिथने दोन गडी बाद करत भरातीय संघाला जबर धक्का दिला. त्याचबरोबर केमार रोचने भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपल्या जाळ्यात अडकवले. तसेच उपकर्णधार केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव अनुक्रमे 2 आणि 6 धावा करुन खेळत आहेत.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन) :
शाई होप (डब्ल्यू), ब्रॅंडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, अकेल होसेन, फॅबियन अॅलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच
भारत (प्लेइंग इलेव्हन) :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.