नवी दिल्ली: भारत आणि वेस्टइंडीज संघात फेब्रुवारी महिण्यात वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी वेस्टइंडीज संघ 1 फेब्रुवारीला भारत दोऱ्यावर येणार आहे. तत्पुर्वी या मालिकेसाठी भारतीय संघाने वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तसेच वेस्टइंडीज संघाने देखील आपला वनडे संघ जाहीर केला होता. मात्र आता वेस्टइंडीज संघाने टी-20 मालिकेसाठी आपल्या 16 सदस्यीय (WI squad for T20 series announced) संघाची घोषणा केली आहे.
भारत दौऱ्यावर येणाऱ्या वेस्टइंडीज संघाचे नेतृत्व कायरन पोलार्ड करणार (Captain Kieran Pollard) आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी उपकर्णधार निकोलस पूरन असणार आहे. तसेच वनडे मालिकेसाठी शामराह ब्रूक्स, एनक्रूमाह बोनर आणि केमार रोच यांचा वेस्ट इंडीज संघात समावेश करण्यात आला आहे. भारत विरुद्ध वेस्टइंडीज संघात पहिल्यांदा वनडे मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर टी-20 मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India v West Indies) संघात 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा वनडे सामने खेळला जाणार आहे. तसेच हे सर्व सामने नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अहमदाबाद येथे खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर टी-20 मालिकेतील पहिला सामना 16 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. दुसरा आणि तिसरा सामना 18 आणि 20 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हे सर्व सामने ईडन गार्डन्स स्टेडिअमवर कोलकाता येथे पार पडणार आहेत.
वेस्ट इंडिजचा टी-२० संघ -
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलेन, डॅरेन ब्रावो, रोस्टेन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमिनिक ड्रेक, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, कायल मेयर्स, हेडन वाल्श ज्यूनियर
वेस्ट इंडिजचा वनडे संघ-
कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलेन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्रावो, शमारह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वाल्श ज्यूनियर