हैदराबाद - आयपीएल 2022 सुरु ( IPL 2022 ) असताना मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय किक्रेटमधून निवृत्ती घेतली ( Kieron Pollard Announced Retirement ) आहे. त्याने अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे.
पोलर्डने सांगितले की, "मी दहा वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्ट इंडिज संघात खेळण्याचे माझे स्वप्न होते. गेल्या पंधरा वर्षांपासून टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांत मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करत आहे. पण, आता विचार करुन मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे."
-
POLLARD BIDS FAREWELL TO INTERNATIONAL CRICKET.@windiescricket ❤️❤️.
— Kieron Pollard (@KieronPollard55) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
PS… thank you @insignia_sports for putting this trip down memory lane together to support my statement. https://t.co/1E87uGw1rH
">POLLARD BIDS FAREWELL TO INTERNATIONAL CRICKET.@windiescricket ❤️❤️.
— Kieron Pollard (@KieronPollard55) April 20, 2022
PS… thank you @insignia_sports for putting this trip down memory lane together to support my statement. https://t.co/1E87uGw1rHPOLLARD BIDS FAREWELL TO INTERNATIONAL CRICKET.@windiescricket ❤️❤️.
— Kieron Pollard (@KieronPollard55) April 20, 2022
PS… thank you @insignia_sports for putting this trip down memory lane together to support my statement. https://t.co/1E87uGw1rH
कायरन पोलार्ड आता मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. पाच वेळा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई संघाने यंदा चांगली कामगिरी केली नाही. त्यातच पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती केल्याची घोषणा केली आहे.
पोलार्डची कारकीर्द - पोलार्डने 123 एकदिवसीय आणि 101 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात एकदिवस सामन्यात 2706 धावा त्याने काढल्या आहेत. तर, टी20 क्रिकेटमध्ये 1569 धावा पोलार्डने केल्या आहेत.
हेही वाचा - Photo Gallery : माजी टेनिस स्टार मारिया शारापोव्हाने तिच्या 35व्या वाढदिवशी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी